X
X

बराक आणि मिशेल ओबामासह प्रियांकाचा डिनर

हॉलिवूडमधल्या विशेष निमंत्रितांसाठी असलेल्या या डिनरला प्रियंकालाही बोलवण्यात आले होते.

बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ ते हॉलीवूडची ‘क्वांटिको गर्ल’ अशी छाप पाडलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून थेट डिनरसाठी निमंत्रित करण्यात आले. प्रियांकाने नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये ओबामा दांपत्यासोबत डिनर केला. हॉलिवूडमधल्या विशेष निमंत्रितांसाठी असलेल्या या डिनरला प्रियंकालाही बोलवण्यात आले होते. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर या भेटीची छायाचित्रे पोस्ट केली असून, बराक आणि मिशेल यांना भेटून आनंद झाल्याचे तिने म्हटले आहे.


20
X