31 October 2020

News Flash

Bard of Blood Trailer : ये आनेवाले तुफान की आहट है|

या सीरिजमध्ये इम्रानने कबीर आनंद ही व्यक्तीरेखा साकारली आहे

नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्यानंतर आता वेब सीरिजचा काळ आला आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सारेच वेब सीरिजच्या विश्वात रमत असून ते या सीरिजच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं. अभिनेता शाहरुख खानच्या रेडचिलीज् निर्मिती ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही नवी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वीच या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अभिनेता इम्रान हाश्मी याची मुख्य भूमिका असलेला ‘बार्ड ऑफ ब्लड’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर कमी कलावधीमध्ये लोकप्रिय होत आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये या सीरिजची थोडक्यात झलक दाखविण्यात आली आहे. या सीरिजमध्ये इम्रानने कबीर आनंद ही व्यक्तीरेखा साकारली आहे. कबीर आनंद हा भारतीय गुप्तचर खात्यामध्ये काम करणारा गुप्तहेर असून सध्या तो त्याची ओळख लपविण्यासाठी एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत आहे.

पाकिस्तानमध्ये भारताचे चार गुप्तहेर पकडले जातात. या चार गुप्तहेरांना सोडवण्यासाठी कबीर ऊर्फ एडोसिनला अन्य दोन व्यक्तींसह एका गुप्त मोहिमेवर पाठविण्यात येते. ही संपूर्ण मोहिमेची एक झलक या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आली आहे.

वाचा :  असं घडलं किशोरी शहाणेंचं करिअर!

दरम्यान, या ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीन आणि डायलॉगचा भरणा करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये इम्रान हाश्मीसोबत अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि विनीत कुमार हेदेखील मुख्य भूमिकेत झळकले आहेत. लेखक बिलाल सिद्दीकी यांच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित ही सीरिज २७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 6:43 pm

Web Title: bard of blood trailer netflix release emraan hashmi ssj 93
Next Stories
1 ब्रेकअपनंतर स्वराच्या आयुष्यात फुलतंय नवं प्रेम; या दिग्गज व्यक्तीच्या मुलाला करतेय डेट?
2 असं घडलं किशोरी शहाणेंचं करिअर!
3 ‘खान’दानला मागे टाकत जगभरात सर्वाधिक कमाई करणारा ‘हा’ एकमेव भारतीय अभिनेता
Just Now!
X