News Flash

‘बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेत विवाह विशेष सप्ताह !

शर्वरी, जान्हवीच्या नव्या आयुष्याला होणार सुरुवात...

शर्वरी, जान्हवीच्या नव्या आयुष्याला होणार सुरुवात...

लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध. नव्या आयुष्याची सुरुवात. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आपल्या कुटुंबाला मागे सोडून नवर्‍याच्या घरी मुलगी जाते ती फक्त आपल्या जोडीदारावर असलेल्या विश्वास आणि प्रेमामुळे… लग्नानंतर मुलीचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते…’बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकांमध्ये येत्या आठवड्यात जान्हवी – विभास आणि शंतनू – शर्वरी यांचा लग्नसोहळा बघायला मिळणार आहे.

‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये शंतनू आणि शर्वरी अखेर लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. यांचा विवाह सोहळा आनंदात पार पडणार आहे.  दोघांचे लग्न पारंपारिक पध्दतीने पार पडणार असून प्रत्येक विधीला साजेसा असा उखाणा देखील घेणार आहेत. सप्तपदी जरा विशेष असणार आहे, कारण शंतनू शर्वरीला उचलून फेरे पूर्ण करणार आहे. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख, हिरव्या रंगाची साडी, हिरवा चुडा, मंगळसूत्र या लूकमध्ये शर्वरी खूप सुंदर दिसत आहे. आता खर्‍या अर्थाने शंतनूला शर्वरीची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे. इतक्या दिवसांनंतर या दोघांच्या आयुष्यात आलेला आनंद असाच टिकून राहो अशीच इच्छा असणार आहे हे नक्की !

आणखी वाचा : ‘अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे; माझ्या गाण्यांमुळे…’, अभिजीत भट्टाचार्य

तर दुसरीकडे, ‘बायको अशी हव्वी’ मालिकेमध्ये विभास राजेशिर्के आणि जान्हवी सातारकर यांचे लग्न अतिशय साध्या पध्दतीने पार पडणार आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळी, रांगडा बाज दिसून येणार आहे. जान्हवी पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. लग्न निर्विघ्नपणे पार पडणार आहे. पण, विभासचे सत्य अजून जान्हवीसमोर आले नाहीये. त्याने लपवलेले हे सत्य तिच्यासमोर कधी आणि कसे येईल ? राजेशिर्के कुटुंबात जान्हवी कशी रमेल ? विभासचं खरं रूप तिच्यासमोर येईल ? हे बघणे रंजक असणार आहे.

आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

या दोन्ही मालिका कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहेत. विवाह विशेष सप्ताह ‘बायको अशी हव्वी’ रात्री ८.३० आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ रात्री १०.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 3:38 pm

Web Title: bayko ashi havi and shubhmangal online marriage special episode marathi serial update dcp 98
Next Stories
1 सलमान, अक्षय नंतर आता केआरकेचा विद्या बालनशी पंगा, म्हणाला..
2 मलाही इथे सेल्फी काढायची आहे…!; सोनू सूदने व्यक्त केली मनातली इच्छा
3 ‘जागतिक संगीत दिना’च्या निमित्ताने सावनी रविंद्रचं मल्याळम गाणं रिलीज
Just Now!
X