प्रसिद्ध सेलिब्रिट शेफ व ‘बिग बॉस मराठी २’चा माजी स्पर्धक पराग कान्हेरे नुकताच लग्नबंधनात अडकला. पराग व त्याची पत्नी मुक्ता भातखंडे सध्या सिक्कीममध्ये हनिमून एंजॉय करत आहेत. परागने हनिमूनचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. मात्र या जोडीला चाहत्यांनी करोना विषाणूपासून स्वत:ला जपण्याचा सल्ला दिला आहे.
‘सिक्कीम.. नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनसाठी या ठिकाणी येण्याचा मी सल्ला देईन. मुक्ता पराग कान्हेरेसोबत मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतोय. ही जागा स्वर्गासारखी आहे’, असं परागने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. यावर अनेकांनी त्याला करोना विषाणूची आठवण करून दिली. ‘सध्या करोनाची वेळ आहे’, असं एका युजरने लिहिलं. तर दुसऱ्याने पराग व मुक्ताला सुरक्षित राहण्यास सांगितले.
आणखी वाचा : ‘घाडगे & सून’ फेम भाग्यश्री व भूषण प्रधानमध्ये नेमकं काय शिजतंय?
परागचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने माधवी पावसेशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. काही वर्षांपूर्वी या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर परागने आता मुक्ताशी एका खासगी समारंभात लग्नगाठ बांधली. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात असतानाही पराग फार चर्चेत होता. या पर्वात पराग कान्हेरे व रुपाली भोसले या दोघांची ‘लव्हस्टोरी’ चर्चेचा विषय ठरली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2020 10:51 am