बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय-बच्चन तिच्या अभिनयासोबतच फॅशनसेन्ससाठीही ओळखली जाते. नुकतीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झालेली ऐश्वर्या अनेक वेळा इन्स्टाग्रामवर तिच्या फॅमिलीचे फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोजला चाहत्यांकडून पसंतीही मिळते. मात्र काही दिवसापूर्वी तिचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसून येत होती.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये ऐश्वर्यापेक्षा तिच्या मोबाइलची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. तिच्या मोबाइल कव्हरवर तिने इंग्रजीमध्ये खास अक्षरं लिहिला असून या अक्षरांवरुन तिचं कुटुंबियांवर किती प्रेम आहे ते स्पष्टपणे दिसून येत आहे. ऐश्वर्याच्या मोबाइल कव्हरवर ARB हे तीन अक्षरं लिहिली आहेत. या अक्षरांमागचा अर्थ ऐश्वर्या राय- बच्चन असा होतो. यावरुन ती सासर आणि माहेरच्या व्यक्तींवर किती प्रेम आणि आदर करते हे स्पष्ट होतं.

Gudi Padwa 2024 Wishes messages and quotes in Marathi
Gudi Padwa 2024: गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?

दरम्यान, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये ऐश्वर्या अखेरची झळकली होती. त्यानंतर आता ती हॉलिवूड चित्रपट ‘मेलिफिसेंट द मिस्ट्रेस ऑफ एविल’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेला आवाज देणार आहे. इतकंच नाही तर ती लवकरच मनिरत्नमच्या आगामी चित्रपटामध्येही झळकणार आहे.