बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने नुकतेच ‘भूत पोलिस’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. आता लवकरच सैफ ‘आदिपुरूष’च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, आदिपुरूषचे चित्रीकरण करीनामुळे लांबणीकर गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ आदिपुरूषच्या चित्रीकरणाला मार्चपासून सुरूवात करणार आहे. करीना पुन्हा एकदा आई होणार असल्याने तिच्या प्रसुतीनंतर सैफला बाळासोबत थोडा वेळ घालवता यावा यासाठी शूटिंग लांबणीवर टाकण्यात आल्याचे ओम राऊत यांनी सांगितले.
आणखी वाचा : सिद्धार्थ-मितालीचं ‘साऊथ स्टाइल’मध्ये केळवण
आदिपुरूष या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जानेवारीतच सुरूवात होणार होती. परंतु करीना गरोदर असल्याने चित्रीकरणला उशीर होणार असल्याच्या चर्चा आहेत. सैफ गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या भूमिकेची तयारी करत आहे.
‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये प्रभास प्रभू श्रीराम यांची तर क्रिती सॅनन माता सिताची भूमिका साकारणार अशा चर्चा आहेत. तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 11:56 am