News Flash

सिद्धार्थ-सखीची ‘बेफाम’ केमिस्ट्री; पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रीन

सखी- सिद्धार्थचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकतीच मिताली मयेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. २४ जानेवारीला पुण्यात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. मात्र, या लग्नानंतर सिद्धार्थ -मिताली या जोडीची चर्चा होण्याऐवजी सिद्धार्थ आणि सखी गोखले याच जोडीची चर्चा रंगली आहे. या दोघांची चर्चा होण्यामागे एक खास कारणदेखील आहे.

सखी आणि सिद्धार्थ लवकरच ‘बेफाम’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  ‘बेफाम’ या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ- सखी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सिद्धार्थ-सखी रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहे. त्यामुळे हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन कृष्णा कांबळे यांनी केलं असून अमोल कागणे यांनी निर्मिती केली आहे. ‘हलाल’, ‘लेथ जोशी’, ‘परफ्युम’, ‘वाजवूया बँड बाजा’ या यशस्वी चित्रपटांच्या निर्मितीनंतर अमोल ‘बेफाम’ हा चित्रपट आगळा वेगळा विषय हाताळणारा आहे.  हा चित्रपट येत्या २६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 4:08 pm

Web Title: befam new upcoming marathi movie lovable chemistry between siddharth chandekar and sakhi gokhale ssj 93
Next Stories
1 सैफ करीनाला डेट करतोय हे कळताच रानी मुखर्जीने दिला ‘हा’ सल्ला
2 सिद्धार्थशी लग्न झाल्यानंतर मितालीचा महत्त्वाचा निर्णय; सोशल मीडियावरून दिली ‘ही’ माहिती
3 सुबोध भावेपासून बिग बींपर्यंत; सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
Just Now!
X