News Flash

VIDEO: वाणी-रणवीर करत आहेत ‘खुलके-डुलके प्यार’

९ डिसेंबरला रणवीर आणि वाणीचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

छाया सौजन्य- ट्विटर, युट्यूब

बॉलिवूडमध्ये आदित्य चोप्राचा चित्रपट म्हटलं की त्यात पंजाबी तडका हवाच. मग ते गाणं असो किंवा मग चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणाऱ्या नायक-नायिकेच्या भल्या मोठ्या पंजाबी कुटुंबामध्ये होणारी धम्माल असो. हाच पंजाबी टच आदित्यच्या आगामी ‘बेफिक्रे’ या चित्रपटामध्येही पाहायला मिळत आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटातील ‘हार्ड कोर’ पंजाबी गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘खुलके-डुलके प्यार’ हे गाणे सध्या अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग झाले आहे.

वाचा: …म्हणून ‘बेफिक्रे’मध्ये अदित्यने रणवीरला दिली पसंती

प्रसिद्ध पंजाबी गायक गिप्पी गरेवाल आणि हर्षदिप कौरने हे गाणे गायले असून विशाल-शेखर या संगीतकार जोडीने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि इतर गाणी पाहता हे गाणे काहीसे वेगळे आणि अनेकांनाच त्यावर ताल धरायला भाग पाडणारे आहे. ‘खुलके-डुलके’ या गाण्यामध्ये रणवीर आणि वाणी मॉडर्न टच असलेल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये दिसत आहेत. गाण्याचे बोल, पंजाबी ठेका, रणवीर आणि वाणीचा धम्माल डान्स अनेकांचेच लक्ष वेधत आहे. नुकतेच राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये हे गाणे मोठ्या उत्साहात लॉन्च करण्यात आले. रणवीर आणि वाणीच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचाही उत्साह पाहायला मिळाला. बऱ्याच काळानंतर दिग्दर्शनाकडे वळलेल्या आदित्य चोप्राच्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवत आहेत.

वाचा: होय मी बेशरम आहे- रणवीर सिंग

या चित्रपटामध्ये दोन अशा पात्रांची कहाणी साकारण्यात आली आहे जे एकमेकांच्या नात्याला प्रेम आणि नात्याचे, रिलेशनशिपचे नाव देऊ इच्छित नाहित. त्यामुळे येत्या काळात रणवीरने साकारलेला ‘धरम’ आणि वाणीने साकारलेली ‘शायरा’ प्रेक्षकांना कितपत भावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ९ डिसेंबरला रणवीर आणि वाणीचा हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 10:10 am

Web Title: befikres song khulke dhulke ranveer singh vaani kapoor and a bollywood punjabi wedding watch video
Next Stories
1 एक सितार, चार तबले, चार ताल आणि चार राग
2 .. म्हणून गर्दीतही स्वत:ला एकटा समजतो किंग खान
3 हृतिकसोबत ‘या’ चित्रपटात झळकणार त्याचा बॉडीगार्ड?
Just Now!
X