News Flash

आधी लगीन पिंपळाशी मग अभिषेकशी, लग्नाआधी ऐश्वर्याने केले का हे विधी?

जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी. या दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले. काल यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही त्यांच्या चाहत्यांना या दोघांच्या लग्नातील अनेक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यात सगळ्या चाहत्यांना प्रश्न होता की मंगळ असलेल्या ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न करण्याआधी पिंपळाच्या झाडाशी लग्न केलं का? असे अनेक प्रश्न या दोघांच्या लग्ना आधीपासून त्यांच्या चाहत्यांकडून विचारले जातं होते.

ऐश्वर्याला मंगळ असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे चर्चा होत्या की ऐश्वर्याचं लग्न जास्त काळ टिकणार नाही. त्यात जर ऐश्वर्याला तिचं लग्न टिकवायचं असेल तर, ऐश्वर्याला अनेक विधी कराव्या लागतील. त्यात सगळ्यात पहिली विधी म्हणजे ऐश्वर्याला पिंपळाच्या झाडाशी लग्न करावं लागेल.

यासाठी संपूर्ण बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्याचं संपूर्ण कुटुंब हे उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या श्री काशी विश्वनाथ या मंदिरात गेले होते. त्यानंतर ते संकट मोचन मंदिरात गेले आणि तिथेच ऐश्वर्याच पिंपळाच्या झाडाशी लग्न करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, असे काही झाले नव्हते. “संपूर्ण बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्याचं कुटुंब हे तिथे फक्त दर्शन घेण्यासाठी आल्याची माहिती”, मंदिरातील पुजारी श्रीकांत मिश्रा यांनी दिली.

ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या जोडीला बॉलिवूडचं सुपरकपल म्हणून ओळखलं जातं. १६ नोव्हेंबर २०११ मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 7:09 pm

Web Title: before getting married to abhishek bachchan did aishwarya got married to a tree know the fact dcp 98
Next Stories
1 “मी राजकारणात येण्याने त्यांचं दुःख कसं कमी होईल?” सोनिया गांधीबद्दल बोलले होते अमिताभ बच्चन
2 वाढत्या लोकसंख्येवरील ट्विटमुळे कंगना आणि कॉमेडियन सलोनीमध्ये जुंपली!
3 ठरलं तर! या दिवशी प्रदर्शित होणार सलमानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’
Just Now!
X