News Flash

करणच्याआधी आलियानेच शेअर केला रुही- यशचा फोटो

करणने त्याच्या दोन्ही मुलांना जगासमोर आणण्याचा एक खास प्लॅन तयार केला आहे

यंदाची दिवाळी वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तिघांसाठी फार खास होती. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या त्यांच्या पदार्पणातील सिनेमाला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली. पण त्याहूनही एक खास गोष्ट आलियाने प्रेक्षकांना भेट म्हणून दिली. इन्स्टाग्रामवर आलियाने पहिल्यांदा रुही आणि यश या करण जोहरच्या मुलांचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये वरुण, सिद्धार्थ, करण रुही आणि यशसोबत खेळताना दिसत आहेत.

असेही म्हटले जाते की, करणने त्याच्या दोन्ही मुलांना जगासमोर आणण्याचा एक खास प्लॅन तयार केला आहे. नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये त्याने सांगितले की, तैमुरच्या वाढदिवसाला तो रुही आणि यशला सर्वांसमोर आणणार.

पण आलियाला तेवढे थांबणेशी शक्य नव्हते म्हणून तिने आधीच रुही आणि यशचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. स्वतः आलिया करणला वडील मानते. दिवाळीच्या संध्याकाळी तिने दोघांचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. याआधीही करणनेही रक्षाबंधनला दोघांचे फोटो शेअर केले होते.

Next Stories
1 बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा
2 ‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये दिवाळीची धमाल
3 २८० रुपयांवरून ट्विंकल खन्ना दुकानदारावर भडकली
Just Now!
X