News Flash

सलमान आधी ऐश्वर्यावर संजय दत्त झाला होता फिदा, पण या व्यक्तीने दिली होती ताकीद

संजय दत्तने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

संजय दत्तने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असतो. संजय दत्तचे नाव अभिनेत्री टीना मुनिम आणि माधुरी दीक्षितसोबत घेण्यात आले होते. दरम्यान, कमी लोकांना माहित आहे की सलमान आधी संजय दत्तला ऐश्वर्या राय आवडली होती. एका मुलाखतीत संजयने या बद्दल सांगितले होते.

ऐश्वर्याने १९९७मध्ये ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या आधी १९९४ मध्ये ऐश्वर्याने ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकला होता. मात्र, त्या आधीच ऐश्वर्या एक लोकप्रिय मॉडेल होती. १९९३ मध्ये फिल्मफेअर मॅग्झीनच्या फ्रंटपेजसाठी ऐश्वर्याने संजय दत्तसोबत फोटोशूट केले होते.

आणखी वाचा : ‘माझा नवरा पर्फेक्ट आहे पण…’, शिल्पाने केला खुलासा

संजयने ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका जून्या मुलाखतीत सांगितले की, त्याने ऐश्वर्याला पहिल्यांदा कोल्ड ड्रिंक ब्रँडच्या एका जाहिरातीत पाहिले होते. प्रत्येका प्रमाणेच संजय ऐश्वर्याला बघतचं राहिला. ऐश्वर्याला पाहून तो म्हणाला, ‘ही सुंदर मुलगी कोण आहे?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

संजय दत्त जेव्हा ऐश्वर्याबरोबर शूट करणार होता, तेव्हा त्याच्या बहिणीनेही त्याला ऐश्वर्याचा नंबर घेऊ नको किंवा तिला फुले पाठवू नकोस असा इशारा दिला होता. संजय म्हणाला, “खरतरं माझ्या बहिणींना ऐश्वर्या प्रचंड आवडते. कारण ती खूप सुंदर आहे. ती त्यांना आधीच भेटली सुद्धा आहे. माझ्या बहिनीने मला ताकीद दिली होती की ऐश्वर्याच्या जवळ जाण्याचा विचार देखील करू नकोस. तिचा नंबर घेऊ नकोस आणि तिला फुलं देखील पाठवू नकोस.”

आणखी वाचा : ३२ वर्षांच्या करिअरमध्ये सलमान खान करणार पहिल्यांदाच बायोपिक?

पुढे संजय म्हणाला,” जेव्हा तुम्ही ग्लॅमरच्या क्षेत्रात येतात तेव्हा ते तुम्हाला बदलू लागते आणि मग आपण मोठे होऊ लागतो त्यामुळे तो निरागसपणा निघून जातो. ऐश्वर्या सध्या जितकी सुंदर आहे ते तिच्या चेहऱ्यावरून अदृश्य होईल कारण तिला या चित्रपटसृष्टीला सांभाळाव लागेल जे इतक सोप नाही.”

आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

दरम्यान, मॅग्झीनचे शूट झाल्याच्या बऱ्याच वर्षांनंतर संजय दत्त आणि ऐश्वर्याने एकत्र चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी फक्त ‘शब्द’ आणि ‘हम किसी से कम नही’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 6:48 pm

Web Title: before salman khan sanjay dutt was blown away by aishwarya rai beauty was warned not to go close dcp 98
Next Stories
1 ‘जितके प्रेम पाकिस्तान मधून मिळाले..’,अक्षयचा जुना व्हिडीओ शेअर करत केआरकेने साधला निशाणा
2 ‘ओके कंप्यूटर’चा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर!
3 “काही तरी वेगळं येतंय…अंदाज लावा”, फोटो शेअर करत कार्तिक आर्यनने चाहत्यांना टाकलं कोड्यात
Just Now!
X