News Flash

VIDEO: त्या भिकाऱ्याने शाहरुखकडे जेवण मागितले आणि..

शाहरुखने त्या भिकाऱ्याची भेट घेतली

छाया सौजन्य- युट्यूब

कलाकार आणि कलाविश्व यांबद्दल अनेकांमध्ये नेहमीच कुतुहलाचे वातावरण पाहायला मिळते. आलिशान घर, राहणीमान आणि प्रत्येक ठिकाणी मिळणारे चाहत्यांचे प्रेम पाहिले की अशा कलाकारांचा अनेकांनाच हेवा वाटतो. पण, परिस्थिती आणि प्रसंगांवर मात करत आणि त्या प्रसंगातूनच यशाच्या वाटेवर जाणारे काही कलाकार नेहमीच इतरांशी आत्मियतेने वागतात. त्यामुळे त्यांच्यात दडलेली माणुसकी पाहून त्या कलाकारांना चाहत्यांचं अमाप प्रेम मिळतं यावर विश्वास बसतो. बी टाऊनमधील असाच एक कलाकार म्हणजे अभिनेता शाहरुख खान.

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध कलाकारांच्या यादीत अभिनेता शाहरुख खानच्या नावाचा समावेश होतो. सध्या किंग खान त्याच्या विविध चित्रपटांच्या चित्रिकरणांमध्ये व्यग्र आहे. नुकतेच त्याने मुंबईतील एका हॉटेलमध्ये आनंद एल राय यांची भेट घेतली होती असे वृत्त डीएनएने प्रसिद्ध केले. काही तासांच्या या भेटीनंतर शाहरुख जेव्हा हॉटेलच्या बाहेर आला तेव्हा एक भिकारी त्याच्याजवळ आला. शाहरुख कारमध्ये बसायला जाणार तोच, तो भिकारी त्याच्या कारजवळ आला आणि बऱ्याच वेळापासून शाहरुखची आपण वाट पाहात असल्याचे त्याने सांगितले. त्या भिकाऱ्याने शाहरुखची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करत त्याच्याकडे काही खाण्यासाठी मिळेल का अशी मागणी केली. भिकाऱ्याची ही मागणी ऐकताच किंग खानने त्याच्या टीमला लगेचच त्या भिकाऱ्यासाठी खाण्याची सोय करण्यास सांगितले.

शाहरुखने त्या भिकाऱ्याची भेट घेतली, त्याचे म्हणणेही ऐकून घेतले. सोशल मीडियावर शाहरुखने भिकाऱ्याला मदत केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये हा सर्व प्रसंग पाहण्यास मिळत आहे. त्या याचकाच्या जेवणाची सोय करुन दिल्यानंतर शाहरुख ज्यावेळी तिथून निघून गेला त्यावेळी शाहरुखच्या अंगरक्षकाने लगेचच क्षणाचाही विलंब न करता त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली. किंग खानच्या माणुसकीची झलक त्याच्या या कृत्यातून पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा अभिनेता मनानेही तितकाच ‘रईस’ आहे, असेच म्हणावे लागेल.

चित्रपटातील भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा हा अभिनेता भारतातच नव्हे तर, भाताबाहेरही चांगलाच प्रकाशझोतात आहे. शाहरुख खान लवकरच एका अमेरिकन टिव्ही शोमध्ये झळकणार आहे. सायन्स फिक्शन डिटेक्टीव शो- ‘डिर्क जेंटली होलिस्टिक डिटेक्टिव एजन्सी’ साठी शाहरुखला निमंत्रण आले आहे. विशेष म्हणजे ट्विटरवरुन आलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करुन शाहरुखने अमेरिकेला जाण्याचे संकेत दिले आहेत. सायन्स फिक्शन डिटेक्टीव शो -‘डिर्क जेंटली होलिस्टिक डिटेक्टिव एजन्सी’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात त्याला पाहुणा म्हणून बोलविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 10:53 am

Web Title: beggar asked shah rukh khan for food
Next Stories
1 या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूची सोशल मिडीयावर अफवा
2 सिने’नॉलेज’ : लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले नाटक कोणते?
3 Dil Dosti Duniyadari season 2 : कॅम्पस कॅलिडोस्कोप : ‘डीथ्री’ फॉरएव्हर..
Just Now!
X