News Flash

‘सा रे ग म’मधला अनुभव सांगतायेत बेला शेंडे

१९९८ मध्ये बेला यांनी सा रे ग म हा शो जिंकला होता.

‘सा रे ग म’मधला अनुभव सांगतायेत बेला शेंडे

१९९८ मध्ये गायिका बेला शेंडे यांनी ‘सा रे ग म’ या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी त्या विजेत्या झाल्या होता. त्यावेळचा अनुभव बेला शेंडे यांनी लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादामध्ये सांगितला आहे. “सा रे ग म मधील प्रवासाविषयी सांगण्यासारखं बरच काही आहे. सा रे ग म म्हणजे एक शाळा होती. तेथून बाहेर पडताना आम्ही खूप काही शिकून बाहेर पडलो होतो. पहिल्यांदा मी सा रे ग म मध्ये १९९४-९५मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर १९९८ मध्ये मी सा रे ग म जिंकले” असे बेला शेंडा म्हणाल्या.

सा रे ग म या शोमध्ये अनेक दिग्गज गायक परिक्षक म्हणून असायचे. आताच्या स्पर्धेपेक्षा फार वेगळी स्पर्धा त्यावेळी पाहायला मिळायची. तेव्हाचा ‘सा रे ग म’मधील पूर्ण प्रवास बेला शेंडे यांनी सांगितला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 4:31 pm

Web Title: bela shende shares her experience in sa re ga ma avb 95
Next Stories
1 ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’मधून जॅक स्पॅरोला केलं बाहेर; ही अभिनेत्री साकारणार मुख्य व्यक्तिरेखा
2 लॉकडाउनमुळे अभिनेता आर्थिक संकटात; १४०० किलोमीटर प्रवास करत पोहोचला घरी
3 ज्यांना लोकशाही संपण्याची भीती वाटते, त्यांनी निवडणुकीत उतरावं -मनोज वाजपेयी
Just Now!
X