बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘बेल बॉटम’ असं आहे. गेल्या काही काळापासून सतत चर्चेत राहिलेल्या ‘बेल बॉटम’चं चित्रीकरण अखेर पूर्ण झालं. लक्षवेधी बाब म्हणजे जगभरातील इतर चित्रपट करोनामुळे लांबणीवर गेले असताना ‘बेल बॉटम’च्या निर्मात्यांनी मात्र चित्रीकरण सुरु ठेवलं आणि लॉकडाउनमध्येच संपूर्ण चित्रपट तयार केला.

अवश्य पाहा – बिग बॉस १४ मध्ये झळकणार ग्लॅमरस पवित्रा; ७ दिवसांसाठी मिळणार लाखो रुपयांचं मानधन

लॉकडाउननंतर विदेशात शूट होणारा ‘बेल बॉटम’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण स्कॉटलॅण्डमध्ये सुरु होतं. हा चित्रपट येत्या २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रंजित तिवारी यांनी केलं आहे. “एकट्याने केलं असतं तर फार थोडंथोडकं झालं असतं. मात्र, सगळ्यांनी मिळून केल्यामुळे मोठं काम पार पडलं आहे. हे टीमवर्क आहे. या टीममधील प्रत्येकाचे मनापासून आभार. बेल बॉटमचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. हे पाहा नवीन पोस्टर.” अशा आशयाचं ट्विट करुन अक्षयने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

अवश्य पाहा – “प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न

अवश्य पाहा – भूमी पेडणेकर म्हणते, “…तर हा अभिनेता असता ‘सेक्स उपचार तज्ज्ञ’

‘बेल बॉटम’ या चित्रपटात अक्षयसोबत हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आले. येत्या काळात ‘सूर्यवंशी’ ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’ ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे एकूण सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.