News Flash

प्रसिद्ध अभिनेत्री अपराजिता यांना करोनाची लागण

चोवीस तासांत देशात करोनाबाधितांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे; संसर्गाच्या प्रमाणात घट

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपराजिता आद्य यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. करोनामुळे त्यांच्या ‘रन्नाबना’ या मालिकेचे चित्रीकरणही पुढे ढकलण्यात आलं आहे.

अवश्य पाहा – महाराष्ट्रात राहून तुला मराठीची लाज का वाटते?; महेश टिळेकरांचा जान कुमारला संतप्त सवाल

करोना संसर्गाच्या प्रमाणात घट

देशात चोवीस तासांतील करोनाच्या संसर्गाबाबतची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये नव्या बाधित रुग्णांच्या तुलनेत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एकूणच देशभरात करोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र आहे.

अवश्य पाहा – “४ हजार कोटी द्या चित्रपट ऑनलाईन रिलीज करतो”; निर्मात्याची खुली ऑफर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशाच गेल्या चोवीस तासांत ४३,८९३ नवे रुग्ण आढळून आले. तर ५८,४३९ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ७९,९०,३२२ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ५०८ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या १,२०,०१० वर पोहोचली आहे. त्याचबरोबर गेल्या चोवीस तासांत १५,०५४ अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्याने देशात सध्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६,१०,८०३वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 3:49 pm

Web Title: bengali actress aparajita adhya coronavirus positive mppg 94
Next Stories
1 काजलच्या घरी लगीनघाई! बहिणीने शेअर केला खास फोटो
2 अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या पोस्टवर सुहाना खानची कमेंट, म्हणाली…
3 प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर ‘राधेश्याम’ची भुरळ; ४ दिवसात रचला ‘हा’ इतिहास
Just Now!
X