बहुप्रतिक्षित, बहुचर्चित असा मराठी चित्रपट ‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील दमदार डायलॉग्ज सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांचा उदय आणि अस्त या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अभिनेता सुबोध भावे हा काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेत दिसणार असून सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, मोहन जोशी असे स्टार कलाकार या चित्रपटात दिग्गज कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ट्रेलर आणि टीझरमधील दमदार संवाद-

D Gukesh
१७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने रचला इतिहास, विश्वनाथन आनंदनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित

१. ”संभाजी म्हणजे बेदरकार, नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक की ज्याची जरब खुद्द औरंगजेबलाही बसेल.”
२. ”हा संताप, हि बेफिकरी, हाच तुमचा संभाजी”
३. ”आजपासून काशिनाथ पर्व सुरू झालंय.”
४. ”जोपर्यंत आपण आपली स्वत:ची लाल करून घेत नाही, तोपर्यंत लाल्या होत नाही.”
५. ”नट होण्याकरता जे कसब अंगी असावं लागतं त्यापेक्षा जास्त त्या नटाला सांभाळून घेण्याकरता लागतं.”
६. ”शरीराचे सगळे स्नायू ताणून एन्ट्री घ्यायची, आणि असं स्पॉट बघून गरगर गरगर डोळे फिरवले की लोक टाळ्या वाजवतात हो.”

७. ”काशिनाथ घाणेकर ही मराठी रंगभूमीला लागलेली कीड आहे.”
८. ”आणि माझ्या नावाच्या आधी लागतं नंतर नाही, या थिएटरचा लांडगा फक्त एक आहे..मी”
९. ”तुझं म्हणजे वर्गातल्या सर्वांत ब्रिलियंट मुलासारखं आहे, जो मस्ती ही दाखवण्यासारखी करतो, की आपलं कधीच कुणी वाकडं करू शकत नाही.”
१०.” काशिनाथ म्हणजे सगळ्या धान्याची सरमिसळ आहे, खडेपण आहेत त्याच्यात”

(आणखी वाचा : ‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’मधील भूमिका ओळखा पाहू, अमृताच्या ट्विटने वाढली उत्सुकता )

११. ”सगळेच इतिहास वाचत बसले, तर तो घडवणार कोण?”
१२. ”पुन्हा तोंडावाटे शिवी तर हासड म्हटलं त्याला, नाय जबान कापून हातात दिली ना तर नाव लाल्या सांगणार नाय.”
१३. ”आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय….इंटरव्ह्यू एकदम टॉप..एकदम कडक”
१४. ”काशिनाथ घाणेकर भारतीय रंगभूमीवरचा पहिला नव्हे, अखेरचा सुपरस्टार आहे.”
१५. ”चार मुंड्या मुरगळून दोन चाळी बांधत्या आल्या तर बेशक तसं करावं, उसमे क्या है?”