भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरुन ५९ चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या यादीमध्ये टिक-टॉक या लोकप्रिय अ‍ॅपचा देखील सामावेश आहे. सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री मलायका अरोरा हिने आनंद व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियाद्वारे या निर्णयाचं कौतुक केलं आहे.

अवश्य पाहा – चित्रपटांची होम डिलिव्हरी; हे ‘सात’ चित्रपट प्रदर्शित होणार हॉटस्टारवर

“अखेर आता आम्हाला असे बेकार व्हिडीओ पाहायला मिळणार नाहीत. या निर्णयासाठी धन्यवाद.” अशा आशायाची इन्स्टास्टोरी लिहून मलायकाने आनंद व्यक्त केला. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आपल्या देशात टिक-टॉक अ‍ॅप मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या पार्श्वभूमीवर मलायकाची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’मधून जॅक स्पॅरोला केलं बाहेर; ही अभिनेत्री साकारणार मुख्य व्यक्तिरेखा

लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.