News Flash

राजकारणावर आधारित ‘हे’ १० चित्रपट एकदा पाहाच

बॉलिवूड आणि राजकारण यांचा जवळचा संबंध आहे

राजकारणावर आधारित ‘हे’ १० चित्रपट एकदा पाहाच

देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सध्या देशभरामध्ये धामधुमीचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय पक्षांनी त्यांची कंबर कसली असून जोरदार प्रचार सुरु आहे. निवडणूकांचा काळ, त्यात होणारं राजकारण अनेक वेळा बॉलिवूड चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि राजकारण यांचा जवळचा संबंध असल्याचं पाहायला मिळत. आजवर अनेक चित्रपट दिग्दर्शकांनी राजकारणावर आधारित चित्रपटांची निर्मिती करत समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चला तर पाहुयात बॉलिवूडमध्ये राजकारणावर आधारित चित्रपटांविषयी –

१. राजनीति –

२०१० मध्ये या चित्रपटाची निर्मिती झाली होती. या चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, कतरिना कैफ यांसारखी स्टारकास्ट मंडळी झळकली आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रकाश झा यांनी घेतली होती. ‘राजनीति’ हा दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा आत्तापर्यंतचा सगळ्यात हिट चित्रपट समजला जातो.

२. सत्याग्रह –
दिग्दर्शक प्रकाश झा यांचा सामाजिक नाट्यावर आधारित ‘सत्याग्रह’ चित्रपट बॉक्स ऑफीसवर गाजला होता. या चित्रपटात बॉलिवूड शेहनशाह अमिताभ बच्च्न, अजय देवगण आणि करिना कपूर हे मुख्य भूमिकेत झळकले असून त्यांच्यासोबत अर्जून रामपाल, मनोज वाजपेयी, अमृता राव यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती यूटीव्ही मोशन आणि झा यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलेल्या उपोषणावर आधारित या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे.

३. डर्टी पॉलिटिक्स-
या चित्रपटाची निर्मिती के.सी बोकाडिया यांनी केली असून हा राजकीय ड्रामा प्रकारात मोडणारा चित्रपट आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत झळकली आहे. तिच्यासोबतच ओमपुरी आणि नसिरुद्दीन शहा यांसारखे नावाजलेल्या कलाकारांनीही स्क्रीन शेअर केली आहे. राजस्थानमधील भवरी देवीच्या सत्यघटनेवरून प्रेरणा घऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. राजस्थानमधील एका शक्तीशाली नेत्याद्वारे भवरीदेवीची हत्या करण्यात आली होती. या चित्रपटात मल्लिकाने भवरीदेवीची भूमिका साकारली होती.

४. गुलाल
२००९ साली अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात राज सिंह चौधरी,दीपक डोबरियाल यासारखी स्टारकास्ट मंडळी झळकली आहेत.

५. नायक –
अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘नायक : द रियल हीरो’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्याकाळी ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामध्ये राजकारण, समाजातील उदासीनता आणि भ्रष्टाचार यावर भाष्य करण्यात आलं होतं.

६. सरकार –
१ जुलै २००५ साली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून पराग यांनी संघवी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या पिता-पुत्राच्या जोडीने एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. त्याच्यासोबतच कतरिना कैफ, तनीशा,अनुपम खेर, सुप्रिया पाठक हे सहकलाकारही झळकले आहेत.
७. फिराक –
चित्रपट दिग्दर्शिका नंदिता दास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा पहिला चित्रपट आहे. गोध्रा हत्याकांडाच्या एक महिन्यानंतर सामान्य लोकांवर त्याचा काय परिणाम झाला, याचे दर्शन या चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. अभिनेता नसीरुद्दीन शहा, दीप्ती नवल, नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल, संजय सुरी, रघुवीर यादव, शहाना गोस्वामी यांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

८. चक्रव्यूह –
देशातील राजकीय, आर्थिक घडामोडींवर अभ्यासपूर्ण सिनेभाष्य करण्यासाठी प्रकाश झा ओळखले जातात. रंग दे बसंती, राजनीती, अपहरण, गंगाजल या चित्रपटांमधून त्यांनी गंभीर विषय संवेदनशीलतेनं मांडले. या चित्रपटांच्या यशानंतर त्यांनी चक्रव्यूह या चित्रपटाची निर्मिती केली. ‘चक्रव्यूह’ या चित्रपटातून त्यांनी नक्षलवादाचा, ‘लाल क्रांती’चा विषय हाताळलाय. या चित्रपटात अर्जुन रामपाल, अभय देओल, मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

९. रक्तचरित्र-
अभिनेता विवेक ओबेरॉय याची मुख्य भूमिका असलेला रक्तचरित्र या चित्रपटाची निर्मिती राम गोपाल वर्मा यांनी केली आहे. २०१० साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये विवेकसोबतच शत्रूघ्न सिन्हा आणि सुदीप हे कलाकारदेखील झळकले आहेत.

१०. युवा –
मे २००४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अजय देवगण आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तशी कामगिरी करु शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2019 12:45 pm

Web Title: best political movies in bollywood
Next Stories
1 प्रिया वारियरच्या त्या व्हायरल व्हिडिओमुळे घेतला हा मोठा निर्णय; दिग्दर्शकाचा खुलासा
2 ‘आँखे-२’मध्ये जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत?
3 खासगी आयुष्य सार्वजनिक केल्याचा नेहाला होतोय पश्चाताप
Just Now!
X