‘देवो के देव.. महादेव’ या पौराणिक मालिकेत रामाची भूमिका साकारणारा अभिनेता पियुष सचदेव याला २३ वर्षीय फॅशन डिझायनरवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ‘बेहद’ मालिकेतही पियुषने काम केले होते.

वाचा : या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला करावा लागला वर्णभेदाचा सामना

‘बॉम्बे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किरण काळे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पियुष सचदेव याला कलम ३७६ अंतर्गत बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता तो तुरुंगात आहे’, असे काळे यांनी सांगितले. पियुषचे वडील कुलवीर सचदेव यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले. तर, ‘गेल्या चार महिन्यांपासून माझा आणि पियुषचा काही संबंध नाही. त्यामुळे मला याविषयी काहीच माहिती नाही’, असे पियुषपासून विभक्त झालेली त्याची पत्नी आकांगशा रावत (Akangsha Rawat) म्हणाली.

वाचा : दहाव्या बॉयफ्रेंडसोबतही सुश्मिताचे फिस्कटले?

‘बेहद’ मालिकेच्या क्रिएटिव्ह टीम मेंबरसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळेही पियुष चर्चेत आला होता. तसेच, हे दोघं लिव्ह इनमध्येही राहत होते. याच कारणामुळे पियुषची पत्नी त्याला सोडून गेल्याचे म्हटले जाते.