News Flash

‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटास पाकिस्तानमध्ये बंदी

बॉलीवूडचे अनेक चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होत असताना फरहान अख्तरने अभिनय केलेला 'भाग मिल्खा भाग' .या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात फरहान

| June 19, 2013 05:26 am

बॉलीवूडचे अनेक चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होत असताना फरहान अख्तरने अभिनय केलेला ‘भाग मिल्खा भाग’ .या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा सिंगची भूमिका केली आहे.
चित्रपटातील एका दृश्यात मिल्खा सिंगला पाकिस्तानात जाण्यास सांगितले असते. पण १९४७ सालातील दंगलीत त्याच्या कुटुंबीयांना अत्यंत निर्दयीपणे मारण्यात आल्यामुळे तो पाकिस्तानामध्ये जाण्यास नकार देतो. त्यावर ” मुझसे नही होगा. मै पाकिस्तान नही जाउगा” या फरहानच्या संवादामुळे पाकिस्तान नियंत्रण मंडळाने चित्रपटाच्या प्रकाशनावर बंदी आणली. दुसरीकडे, हा चित्रपट प्रदर्शित करणारे वायकॉम १८ या चित्रपटातील मिल्खा यांच्या वास्तविक जीवन कथेमध्ये कोणताही बदल करण्यास तयार नसून पाकिस्तानमध्ये प्रदर्शन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 5:26 am

Web Title: bhaag milkha bhaag banned in pakistan
Next Stories
1 स्त्रीला कमी लेखल्यास गुन्हा दाखल व्हावा – अतुल कुलकर्णी
2 सलमानचा ‘ मेंटल’ चित्रपट होणार २४ जानेवारीला प्रदर्शित
3 गर्भलिंगनिदान प्रकरण : शाहरूख खानला पालिकेची ‘क्लिन चिट’
Just Now!
X