दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांचा बॉलीवूडमध्ये यशस्वी वाटचाल करणाऱया ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाची लांबी अर्ध्या तासाने कमी करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या आंतराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रदर्शित झालेल्या चित्रपटात काटछाट करणे काही सोपे काम नसते. त्यामुळे चित्रपटातून नक्की कोणता भाग वगळून टाकायचा? हे दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा आणि चित्रपटाचे व्हिडिओ एडिटर पी.एस.भारथी यांच्या समोर आव्हान ठरणार आहे. चित्रपटात काटछाट करण्याच्या निर्णयाबद्दल बोलत असताना मेहरा म्हणाले की, चित्रपटात कमी लांबीचा करण्याला आमच्यावर कोणताही दबाव नाही, उलट मला आणि भारथी यांना हा चित्रपट मध्यांतराशिवाय प्रदर्शित करायचा होता. भारतीय चित्रपटात मध्यांतर असण्याच्या प्रमाणित बाबतीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा माझा हेतू होता. असेही मेहरा म्हणाले.