करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या देशभरातील लोक त्रस्त आहेत. मात्र अशा परिस्थितीतही वाढते नुकसान कमी करण्यासाठी सरकारने चित्रीकरणास परवानगी दिली आहे. अनेक मालिकांनी नियमांचं पालन करुन चित्रीकरणास सुरुवात केली. मात्र या दरम्यान ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेच्या सेटवर करोना रुग्ण सापडला आहे. टेलीचक्करने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री सौम्या टंडनच्या हेअर ड्रेसरला करोनाची लागण झाली आहे.

अवश्य पाहा – “करण माझ्यावर हसला होता म्हणून आज रडतोय”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

सरकारने परवानगी देताच ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेच्या नव्या भागांचं चित्रीकरण सुरु झालं होतं. मात्र सौम्या टंडनची हेअर ड्रेसर करोना पॉझिटीव्ह निघाल्यामुळे सेटवर काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान या हेयर ड्रेसर्सच्या संपर्कात आलेल्या कलाकारांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. यापूर्वी ‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’ या मालिकेच्या सेटवरही एक करोनाग्रस्त कलाकार सापडला होता. यानंतर ताबडतोब मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं.

अवश्य पाहा – “तुझं ऐकून आम्ही पानमसाला खातोय”; Immunity Booster च्या जाहिरातीवरुन अजय देवगण ट्रोल

भारतात सलग सहाव्या दिवशी २० हजारापेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांची नोंद

भारतात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७ लाख ४ हजार इतकी झाली आहे. तर आतापर्यंतची एकूण मृतसंख्या २० हजार ६४२ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतात सध्या करोनाचे २ लाख ६ हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.