News Flash

‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेचे निर्माते संजय कोहली करोना पॉझिटिव्ह

संजय कोहली होम क्वारंटाइन आहेत

Sanjay Kohli and wife Binaifer are co-founders of Edit II Productions. (Photo: PR handout)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर हैं मालिकेचे निर्माते संजय कोहली यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या ते होम क्वारंटाइन असून घरीच उपचार घेत आहेत. याविषयी त्यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे.

“होय. मला करोनाची लागण झाली आहे. पण मी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच क्वारंटाइन झालो आहे आणि योग्य ती काळजी घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी असा सल्ला मी त्यांना दिला आहे. या संकटात जे इतरांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत, त्या सगळ्यांचे मनापासून आभार”, असं संजय कोहली म्हणाले.

दरम्यान, संजय कोहली हे लोकप्रिय निर्माते असून ‘भाभीजी घर पर हैं ‘व्यतिरिक्त त्यांचा ‘हप्पू की उलटन पलटन’ ही मालिकादेखील लोकप्रिय ठरत आहे. तसंच लवकरच त्यांचा ‘एक्सक्युज मी मॅडम’ हा शोदेखील सुरु होणार आहे. सध्या करोनाची प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना करोनाची लागण झाली आहे. तसंच ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या दोन स्पर्धकांनादेखील करोना झाल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 9:20 am

Web Title: bhabiji ghar par hain tv producer sanjay kohli tests positive for coronavirus ssj 93
Next Stories
1 ‘ये है आशिकी’फेम अभिनेत्याला करोनाची लागण
2 ‘सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी आरोपींना दूरचित्रसंवाद्वारे न्यायालयात हजर करा’
3 प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्ये उर्वशी रौतेला साकारणार सीता?
Just Now!
X