News Flash

भाग्यश्री पटवर्धनचे पुनरागमन

'मैने प्यार किया' या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन लवकरच छोट्या पडद्यावरील 'लौट आओ त्रिशा' या मालिकेत दिसणार आहे.

| June 17, 2014 06:59 am

‘मैने प्यार किया’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन लवकरच छोट्या पडद्यावरील ‘लौट आओ त्रिशा’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती एका हरवलेल्या मुलीच्या आईची भूमिका साकारत आहे. व्यक्तिरेखेतील वैविध्यतेमुळे आपण ही भूमिका स्वीकारल्याचे भाग्यश्रीचे म्हणणे आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रातील पुनरागमनाने उत्साहित झालेली भाग्यश्री म्हणाली, बऱ्याच काळापासून मी मनोरंजनाच्या क्षेत्रापासून दूर आहे. ‘लाईफ ओके’ वाहिनीवरील ‘लौट आओ त्रिशा’ मालिकेद्वारे पुन्हा एकदा काम करण्यास मी खूप उत्सुक आहे.
जुलै महिन्यापासून मालिकेच्या प्रसारणाला सुरूवात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यात भाग्यश्री अम्रिता स्वाइका नावाच्या स्त्रीची भूमिका साकारत आहे. जिला त्रिशा नावाची एक मुलगी आहे, जी हरवली असून, त्रिशाच्या शोधासाठी घराबाहेर पडलेल्या एका आईची ही कथा आहे. या शोधप्रवासात कुटुंबातील आणि नात्यातील अनेक सत्ये तिच्यासमोर येतात.
१९८७ सालच्या ‘कच्ची धूप’ या टीव्हीवरील मालिकेद्वारे भाग्यश्रीने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘झलक दिखला जा-३’ या रिअॅलिटी शो व्यतिरिक्त तिने ‘आंधी जसबातो की’ आणि ‘दीदी का दुल्हा’सारख्या मालिकांमधूनदेखील अभिनय केला आहे. ‘लौट आओ त्रिशा’ या तिच्या आगामी मालिकेची निर्मिती ‘२४ फ्रेम्स’च्या नंदिता मेहरा आणि भैरवी रायचूर करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2014 6:59 am

Web Title: bhagyashree excited to be back in entertainment space
Next Stories
1 या पाच कारणांसाठी पाहा ‘हमशकल्स’
2 माझ्या एकाही मुलाला माझ्यासारख्या सवयी नाहीत- शाहरुख
3 कपूर हे पक्के खवय्ये – अरमान जैन
Just Now!
X