गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचंच आराध्य आणि लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. २२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. करोनाच्या या संकटकाळात गणपती उत्सवाला बंधनाची मर्यादा आहे. मात्र स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ या महामालिकेच्या रुपात गणपती बाप्पालाच आपल्या घरी घेऊन येणार आहे. बाप्पाच्या या विशेष मालिकेमध्ये माता पार्वतीच्या रुपात अभिनेत्री भाग्यश्री मोटे दिसेल. भाग्यश्रीचा लूक शिबाप्रिया सेन यांनी डिझाईन केला आहे. ‘देवा श्री गणेशा’ मालिकेमधील माता पार्वतीचा लूक समोर आल्यानंतर गणपती बाप्पा कोण साकारणार याची उत्सुकता आहे.

भाग्यश्री मोटे या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना म्हणाली, “देवयानीनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहची ‘देवा श्री गणेशा’ ही भव्यदिव्य मालिका साकारायला मिळते आहे याचा प्रचंड आनंद आहे. पार्वतीच्या रुपात जेव्हा मी स्वत:ला पाहिलं तेव्हा मी भारावून गेले होते. या लूकवर बरीच मेहनत घेण्यात आलीय. माता पार्वतीची सौम्यता तिचा हवळेपणा आणि प्रसंगी समोर येणारं रौद्र रुप हे साकारायला मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”

Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

२२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता सुरु होणाऱ्या स्टार प्रवाहच्या ‘देवा श्री गणेशा’ मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी बिग बजेट मालिका आकाराला येतेय. महाभारत, राधेकृष्ण यासारख्या भव्यदिव्य मालिका साकारणारे सुप्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ कुमार तिवारी यांच्या स्वस्तिक प्रॉडक्शन्सने ही भव्य मालिका साकारण्याचं आव्हान पेललं आहे. ही महामालिका साकारण्यासाठी स्टार प्रवाह आणि स्वस्तिक प्रोडक्शन्सची संपूर्ण टीम दिवसरात्र मेहनत करते आहे. उमरगाव इथे या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला येत असून लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे.