News Flash

“फोटोग्राफरने सलमानला मला किस करायला सांगितलं होतं, पण..”; भाग्यश्रीने सांगितला किस्सा

एका मुलाखतीत भाग्यश्रीने फोटोशूटचा तो किस्सा सांगितला.

सलमान खान, भाग्यश्री

सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री भाग्यश्रीचा चेहरा सर्वांच्या ओळखीचा झाला. या चित्रपटातील सरळ- साध्या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. सलमान-भाग्यश्रीच्या केमिस्ट्रीचीही सर्वत्र जोरदार चर्चा झाली. त्यावेळी दोघांनाही अनेक फोटोशूट्स करावे लागले होते. ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने एका फोटोशूटचा किस्सा सांगितला.

“तेव्हा एक प्रसिद्ध फोटोग्राफर होता, जो आता या जगात नाही. त्याला माझे आणि सलमानचे काही हॉट फोटो हवे होते. त्यासाठी त्याने सलमानला बाजूला नेलं आणि त्याला सांगितलं की, मी जेव्हा कॅमेरा सेटअप करेन तेव्हा तू अचानक भाग्यश्रीच्या ओठांवर किस कर. हे सगळं मी स्वत: ऐकलं होतं”, असं तिने सांगितलं.

सलमानने त्या फोटोग्राफरला असं करण्यापासून साफ नकार दिला होता. याविषयी भाग्यश्री पुढे म्हणाली, “आम्ही सगळे इंडस्ट्रीत नवीन होतो आणि त्या फोटोग्राफरला वाटत होतं की त्याला असं करायचं स्वातंत्र्य आहे. त्याला किंवा सलमानला माहित नसेल की मी त्यांच्यातील संभाषण ऐकलं होतं. कारण मी त्या दोघांच्या बऱ्यापैकी जवळ उभी होती. एका सेकंदासाठी मी स्तब्धच झाले होते. पण त्यावेळी सलमानला बोलताना ऐकलं की, मी असं काही करणार नाही. तुम्हाला जर अशी कोणती पोझ हवी असेल तर आधी भाग्यश्रीची परवानगी घ्या.” सलमानची ही प्रतिक्रिया ऐकून भाग्यश्रीने सुटकेचा नि:श्वास सोडला. मी योग्य लोकांसोबत काम करतेय, याची जाणीव तिला झाल्याचं तिने सांगितलं.

‘मैने प्यार किया’ हा चित्रपट जरी ब्लॉकबस्टर ठरला असला तरी नंतर भाग्यश्रीने तिचं करिअर सोडून दिलं होतं. तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या. पण, त्या सर्व ऑफर्स तिने नाकारल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 10:40 am

Web Title: bhagyashree says a photographer once asked salman khan to catch and smooch her his reply won her over ssv 92
Next Stories
1 महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटवर आयुषमान खुरानाचं मराठीत उत्तर, म्हणतो…
2 चलाओ ना नैनो से बाण रे! घायाळ करणारा शेवंताचा फोटो
3 तारांगण घरात : सुट्टीतली ऊर्जा आणि आनंद अनुभवते आहे
Just Now!
X