15 July 2020

News Flash

माझ्या मुलासमोर यश चोप्रा मला ‘बॉलिवूडमधली मूर्ख मुलगी’ म्हणाले होते- भाग्यश्री

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाग्यश्रीने सांगितला किस्सा

सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री भाग्यश्रीचा चेहरा सर्वांच्या ओळखीचा झाला. या चित्रपटातील सरळ- साध्या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. मात्र या चित्रपटानंतर भाग्यश्रीने लग्न केलं आणि चित्रपटांपासून दूर गेली. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने करिअर सोडण्यामागचं कारण सांगितलं. तिच्या या निर्णयामुळे दिवंगत दिग्दर्शक व निर्माते यश चोप्रा तिला ‘बॉलिवूडमधली मूर्ख मुलगी’ असं म्हणाले होते.

“मैने प्यार किया या चित्रपटानंतर अनेकजण माझ्या प्रेमातच पडले होते. लोकांना मी खूप आवडायचे. मला पहिल्याच चित्रपटात यश मिळालं आणि माझे पती त्यावेळी २० वर्षांचे होते. आम्ही दोघांनी लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्या व्यक्तीवर संपूर्ण जग प्रेम करत असेल आणि ती व्यक्ती तुमची असेल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीबद्दल पझेसिव्ह होता”, असं तिने सांगितलं.

आणखी वाचा : “फोटोग्राफरने सलमानला मला किस करायला सांगितलं होतं, पण..”; भाग्यश्रीने सांगितला किस्सा

यश चोप्रा यांच्यासोबतचा किस्सा तिने पुढे सांगितला. “मी त्यावेळी खूप मोठ्या चित्रपटांना नकार दिला होता. मी जेव्हा कधी यश चोप्रा यांना भेटायचे तेव्हा ते उपस्थितांसमोरच मला ओरडायचे. काही वर्षांपूर्वी, मी जेव्हा माझ्या मुलाची ओळख त्यांना करून देत होते, तेव्हा ते त्याला म्हणाले, ही तुझी आई आहे ना.. ती इंडस्ट्रीतली सर्वांत मूर्ख मुलगी आहे. मी चित्रपटांमध्ये काम करावं अशी त्यांची खूप इच्छा होती, पण मी त्यांना नकार द्यायचे”, असं ती म्हणाली.

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू याने २०१९ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. भाग्यश्री लवकरच कंगना रणौतच्या ‘थलायवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 5:28 pm

Web Title: bhagyashree says yash chopra called her the most stupid girl in bollywood in front of son ssv 92
Next Stories
1 “लोक मरतायेत अन् सत्ताधारी बंकरमध्ये बसलेत”; अभिनेत्रीची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका
2 ‘आता मी अभिनेत्री नाही..’; टोळधाडीच्या वादावर झायरा वसीमचं उत्तर
3 चेतन भगत यांनी उपस्थित केला तुमच्या आमच्या मनातील प्रश्न; म्हणे “पाणीपुरीची दुकानं…”
Just Now!
X