News Flash

भाग्यश्री दारूच्या नशेत पोहोचली घरी, या माणसाने लगावली होती कानशिलात

पाहा व्हिडीओ

(Photo credit - bhagyashree instagram)

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. भाग्यश्री सोशल मीडीयावर सक्रिय असल्याचे दिसते. ती सतत तिचे वर्कआऊट व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना देखील दिसतात. आता भाग्यश्रीने फिटनेसचा नाही तर एका चित्रपटातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मद्यपान करुन कोणाला तरी कानाशिलात लगवल्याचा अभिनय करताना ती दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

हा व्हिडीओ भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ भाग्यश्रीच्या एका कन्नड चित्रपटातील आहे. या व्हिडीओत भाग्यश्री उत्तम अभिनय करत असल्याचे दिसत आहे. “कन्नड सुपरस्टार डॉ. शिवराज कुमारसोबत ‘अमावरा गंडा’ या चित्रपटात काम करायला खूप मज्जा आली. मी या चित्रपटात त्या सगळ्या गोष्टी केल्या ज्या मी खऱ्या आयुष्यात करू शकत नाही. १. पुरूषांचा तिरस्कार करणारी.२. मद्यधुंद.३. एखाद्याला मारहाण करणारी… हे मी करू शकते?” असे कॅप्शन भाग्यश्रीने तो व्हिडीओ शेअर करतं दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. भाग्यश्रीचा हा व्हिडीओ २६ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyashree (@bhagyashree.online)

भाग्यश्रीने १९८७ मधील ‘कच्ची धूप’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. भाग्यश्री दक्षिणात्य सुपर स्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटात दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 6:08 pm

Web Title: bhagyashree shared a video in which she was drunk and in anger she slaps person dcp 98
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्या पाठोपाठ पत्नीला देखील करोनाची लागण
2 सईला करायचं आहे कथ्थकमध्ये करिअर
3 बूटी शेक काय आहे? आशा भोसलेंची नक्कल करत जॅमीने उडवली टोनीची खिल्ली
Just Now!
X