News Flash

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

‘घाडगे अँड सून’ या मालिकेत काम करणारी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन झाले आहे. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. भाग्यश्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे.

भाग्यश्रीचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे म्हटले जात आहे. सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. भाग्यश्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘रेस्ट इन पीस बाबा’ असे म्हटले आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भाग्यश्रीने आजवर अनेक जाहिरांतीमध्ये काम केले आहे. त्यानंतर तिने ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत काम केले. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 11:31 am

Web Title: bhagyshree limaye father died avb 95
Next Stories
1 ‘मिसेस श्रीलंका’ विजेतीचं मुकूट हिसकावल्यामुळे परिक्षकाला अटक
2 बिग बॉसमधील अभिनेत्रीचा लग्नानंतर आत्महत्येचा प्रयत्न; ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल
3 अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या ‘पुष्पा’चा सोशल मीडियावर धुमाकुळ, चाहत्यांकडून मोठी पसंती
Just Now!
X