09 March 2021

News Flash

‘चला देशभक्तांनी देखील रस्त्यांवर या’; कंगना रणौतने ‘भारत बंद’ला केला विरोध

शायरी शेअर करत म्हणाली, आज हा किस्सा इथेच संपवू, अन्...

गेल्या १२ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अभिनेत्री कंगना रणौत हिने विरोध केला आहे. चला भारत बंद करुया अन् होडीला आणखी एक भोक पाडूया अशा आशयाची शायरी लिहून तिने आंदोलनकर्त्यांना उपरोधिक टोला लगावला आहे.

अवश्य पाहा – “भावा तूच खरा रॉकस्टार'”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वारंवार टीका करत आहेत. या पार्श्वभूीवर आता तिने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देखील विरोध केला आहे. “आओ भारत को बंद कर देते हैं, यूं तो तूफानों की कमी नहीं इस नाव को, मगर लाओ कुल्हाड़ी, कुछ छेद भी कर देते हैं, रह रह के रोज मरती है हर उम्मीद यहां, देशभक्तों से कहो अपने लिए देश का एक टुकड़ा अब तुम भी मांग लो, आ जाओ सड़क पर और तुम भी धरना दो, चलो आज यह किस्सा ही खत्म करते हैं.” अशी शायरी लिहून तिने आंदोलनकर्त्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक

शेतकऱ्यांच्या आजच्या ‘भारत बंद’ला विविध संघटनांचा पाठिंबा

तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणि मंगळवारच्या भारत बंदच्या आवाहनाला काँग्रेस पक्ष आणि बसपाने पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूर शहर जिल्हा काँग्रेसने प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांनी सहाही विधानसभानिहाय आपापल्या ब्लॉकमध्ये बाजार, मोहल्ला, चौकातील दुकाने बंद करून भारत बंद यशस्वी करण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांना चर्चेला बोलावले, पण एकही मागणी मान्य न करता शेतकऱ्यांचा अपमान केला. त्यामुळे बसपाने भारत बंदचे आवाहन केले असून बसपा त्याला समर्थन देत आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 11:46 am

Web Title: bharat bandh farmers protest kangana ranaut mppg 94
Next Stories
1 love story : …म्हणून शर्मिला टागोर यांना मंसूर अली खान यांनी दिला होता रेफ्रिजरेटर
2 नीतू कपूर आणि वरून धवन पाठोपाठ क्रिती सेनॉनला करोनाची लागण
3 ‘बोलण्याआधी विचार का नाही केलास?’ सैफ अली खानवर संतापले मुकेश खन्ना
Just Now!
X