24 April 2019

News Flash

विनोदवीर भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे पहिल्यांदाच एकत्र झळकणार चित्रपटात

थुकरवाडीतील विनोदवीरांना मोठ्या पडद्यावर पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच असते.

भारत गणेशपुरे, सागर कारंडे

थुकरवाडीतील विनोदवीरांना मोठ्या पडद्यावर पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच असते. अशातच जर दोन विनोदवीर स्क्रिन शेअर करणार असतील तर महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवानीच ठरेल. भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे पहिल्यांदाच मराठी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. आगामी ‘झांगडगुत्ता’ या मराठी चित्रपटात ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे करत आहेत. त्यांनीच चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाबद्दल ते सांगतात की, ‘हा विनोदाची जोडगोळी एकत्र आणण्यासाठी आम्ही जवळपास दीड वर्ष वाट पाहिली. झांगडगुत्ता हा विदर्भातला शब्द आहे. त्याचा अर्थ सावळा गोंधळ असं होतो. विदर्भातील एका छोट्या गावातली या चित्रपटाची कथा आहे. बरेच प्रयत्न करूनही सागरचं लग्न कुठेच जुळत नसतं आणि भारत त्याच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.’

आम्ही आज नायक नसलो तरीदेखील प्रेक्षकांचं आमच्यावर खूप प्रेम आहे आणि विशेष म्हणजे आमच्यासाठी निर्माते- दिग्दर्शक थांबून राहतात. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो, असं भारत म्हणाला.

भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांच्या विनोदाचा हा ‘झांगडगुत्ता’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तो कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on August 20, 2018 11:38 am

Web Title: bharat ganeshpure and sagar karande will work together in marathi movie for the first time