News Flash

‘प्रेमवारी’ चित्रपटात भारत गणेशपुरे आगळ्यावेगळ्या भूमिकेत

'प्रेमवारी' हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

भारत गणेशपुरे

फेब्रुवारी महिना म्हटलं की ‘व्हॅलेंटाइन डे’ आठवल्याशिवाय राहत नाही. याच फेब्रुवारी महिन्यात एक अतिशय सुंदर आणि भावूक अशी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘प्रेमवारी’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजीत चव्हाण आणि भारत गणेशपुरे अशा दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून भारत गणेशपुरे यांच्या अभिनयाची एक वेगळी छटा प्रेक्षकांना दिसणार आहे.

नेहमीच प्रेक्षकांना हसवणारे भारत गणेशपुरे या चित्रपटातून एका गरीब मजुरी करणाऱ्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. दीन असूनही समाधानी आणि आयुष्य नेहमी आनंदाने जगणारा असा हा बाप भारत गणेशपुरे साकारत आहेत. ‘एक हास्य कलाकार म्हणून काम करत असताना अशा भूमिका करायला मला कधीच अडचण वाटत नाही उलट मी अशा भूमिकांना एक संधी म्हणून स्विकारत असतो. कारण एक कलाकार म्हणून तुम्ही विविध प्रकारच्या भूमिका करणे गरजेचे असते. कोणत्याही एका चौकटीत अडकायला किंवा काही भूमिकांसाठीच मर्यादित व्हायला मला आवडत नाही,’ असं ते भूमिकेविषयी सांगताना म्हणाले.

‘प्रेमवारी’ हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. व्हॅलेंटाइन वीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आठवड्यात प्रेम या विषयावर आधारित चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 6:05 pm

Web Title: bharat ganeshpure in a different role in upcoming marathi movie premwari
Next Stories
1 Video : जेव्हा रणवीरसोबत अनिल कपूर रॅम्पवरच धरतात ठेका
2 कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर सेटवर परतली सोनाली बेंद्रे
3 ‘बाहुबली’मधल्या या अभिनेत्याला मिळाले हॉलिवूडचे तिकीट?
Just Now!
X