26 September 2020

News Flash

भरत जाधव पुन्हा हिंदी चित्रपटात

बारा वर्षांपूर्वी ‘प्राण जाए पर शान न जाए’ चित्रपटातून अभिनेता भरत जाधवने हिंदी चित्रपटातून काम केले होते.

| April 23, 2015 12:05 pm

बारा वर्षांपूर्वी ‘प्राण जाए पर शान न जाए’ चित्रपटातून अभिनेता भरत जाधवने हिंदी चित्रपटातून काम केले होते. मात्र, त्यानंतर चांगली भूमिका असेल तरच हिंदीत काम करायचे हा निर्धार असल्याने भरतने अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. इतक्या वर्षांनंतर भरत हिंदी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. कुंदन शहा दिग्दर्शित ‘पी से पीएम तक’ या आगामी चित्रपटात भरत महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
बॉलीवूडमधून अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण, मला त्या चित्रपटांमधील क ोणतीच भूमिका फारशी आवडली नाही. त्यामुळे मी त्या नाकारल्या. हिंदीत काम करायचेच म्हणून चित्रपट स्वीकारणे मला पटत नव्हते. ‘पी से पीएम तक’ हा चित्रपट मी कुंदन शहांचा चित्रपट असल्यामुळे स्वीकारला आहे. कुंदन शहांनी मला पटकथा आणि भूमिका ऐकवली तेव्हाच ती मला आवडली होती. मात्र, तेव्हाही मी त्यांना स्पष्ट विचारले की तुम्ही जशी पटकथा लिहिली आहे तशीच ती सिनेमात उतरणार ना? की ऐनवेळेला काही वेगळेच पाहायला मिळेल. त्यावर ते हसले. आणि तसे काहीही होणार नाही, अशी त्यांनी खात्री दिल्यावरच मी हा चित्रपट स्वीकारला असे भरत जाधव यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.कुं दन शहांचे चित्रपट हे ब्लॅक कॉमेडी प्रकारातले असतात. ‘पी से पीएम तक’ हा चित्रपटही तसाच विनोदी शैलीतून फटकारणारा आहे. मी स्वत: रंगभूमीवरचा कलाकार आहे. त्यामुळे भूमिका आव्हानात्मक असेल तर काम करायला जास्त मजा येते. म्हणून मी या चित्रपटाचा भाग व्हायचा ठरवले असे सांगणाऱ्या भरत जाधव यांनी या चित्रपटात एका मोठय़ा पक्षाच्या मोठय़ा नेत्याची भूमिका केली आहे. मी साठीच्या नेत्याची भूमिका साकारली आहे, असे भरत जाधव यांनी सांगितले. एवढय़ा मोठय़ा वयाच्या नेत्याची भूमिका साकारणे हा धोका वाटला नाही का?, या प्रश्नावर भूमिका चांगली असेल तर मला वयाचा फरक पडत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 12:05 pm

Web Title: bharat jadhav again in hindi film
Next Stories
1 फरहान अख्तरचा महिलांना सक्षमीकरणाचा संदेश
2 लहान मुलांना चित्रपटनिर्मितीचे धडे
3 कलादिग्दर्शन क्षेत्रात चिकाटी आणि अभ्यासूवृत्ती महत्त्वाची-नितीन देसाई
Just Now!
X