News Flash

‘लक्ष्यामामांचा फोन आला आणि..’, भरत जाधवची भावनिक पोस्ट

त्यांच्याशी निगडीत आठवणी प्रत्येक कलाकाराच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत.

मराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ रोजी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी प्रत्येक कलाकाराच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत. अशीच एक आठवण अभिनेता भरत जाधवने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना सांगितली.

भरत जाधवची पोस्ट-

लक्ष्या मामा,
खूप आठवणी आहेत. आम्हा नवोदितांना त्यांनी ज्याप्रकारे वेलकम केलं, आधार दिला, त्यांनी आपलं स्टारपण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना मामा म्हणून हाक मारू शकायचो. खूप काही शिकलो त्यांच्याकडून. त्यांच्याबद्दल सांगायची सगळयात मोठी आठवण म्हणजे पछाडलेला चित्रपट.

‘सही रे सही’ जोरात सुरू होतं. अशातच जानेवारी २००३ ला महेश कोठारे सरांनी पछाडलेलासाठी विचारलं आणि त्यांना लगेच काम सुरू करायचं होत. मला त्या एका वर्षात ऑगस्ट २००३ पर्यंत सही रे सहीचे जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते. त्यामुळे मी त्यांना नकार कळवला. मध्ये काही महिने गेले आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्या मामांचा फोन आला की, “तुझं झालं का ते नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे… महेशला पटकन जाऊन भेट. मी तुझ्यासाठी त्याला थांबवून ठेवलंय. तो पिक्चर सोडू नकोस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

मग त्याच रात्री उशिरा महेश सरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि तिथून लक्ष्या मामांना कळवलं की मी पछाडलेला करतोय. सांगायचा मुद्दा हा की, इतका मोठा माणूस, कोणालाही घेऊ शकले असते. पण त्यांनी ती एवढी मोठी संधी मला दिली. पछाडलेलाला मी त्यांचा आशीर्वाद मानतो.
विनम्र अभिवादन!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 1:05 pm

Web Title: bharat jadhav shares a heartwarming note for late actor laxmikant berde ssv 92
Next Stories
1 बिग बींना आवडला नाही केबीसीमध्ये विचारण्यात आलेला ‘हा’ प्रश्न
2 ‘आश्रम’ या वेब सीरिजला मिळाले तब्बल इतके कोटी व्ह्यूज
3 “यापुढे फक्त नायकच साकारणार”; सोनू सूदने नाकारल्या खलनायकांच्या भूमिका
Just Now!
X