05 December 2020

News Flash

‘…तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आई बाबांना झाला’, भरत जाधवनं सांगितली आनंदी क्षणाची आठवण

सध्या भरत जाधव यांची ही पोस्ट चर्चेत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणजे भरत जाधव. भरत जाधव यांची नवी मालिका ‘सुखी माणसाचा सदरा’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. ही मालिका दसऱ्याच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान भरत जाधव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंदी क्षण सांगितला आहे.

भरत यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई-वडिलांचा पांढऱ्या रंगाच्या बससोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर त्यांनी त्याच्या आयुष्यातील आनंदी क्षण कोणता होता हे सांगितले आहे. ‘आम्ही कॉलेज मध्ये एकांकिका करत असताना चंद्रलेखा नाट्य संस्थेची बस बाहेरून बऱ्याचदा बघायचो. आणि या बसमध्ये आपल्याला कधी तरी बसता येईल का म्हणून नेहमी विचार करायचो. नाटकाच्या बसमध्ये बसणं म्हणजे आम्हा नवोदितांना अप्रुप वाटायचं. नंतर ‘ऑल द बेस्ट’ आलं आणि त्याच बसने हजारो प्रयोग करत संपुर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

आम्ही कॉलेज मध्ये एकांकिका करत असताना चंद्रलेखा नाट्य संस्थेची बस बाहेरून बऱ्याचदा बघायचो. आणि या बसमध्ये आपल्याला कधी तरी बसता येईल का म्हणून नेहमी विचार करायचो. नाटकाच्या बसमध्ये बसणं म्हणजे आम्हा नवोदितांना अप्रुप वाटायचं. नंतर ‘ऑल द बेस्ट’ आलं आणि त्याच बसने हजारो प्रयोग करत संपुर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला. ‘ऑल द बेस्ट’ माझं पहिलं व्यावसायिक नाटक. तेंव्हा मला १०० रूपये नाईट मिळायची. त्यावेळी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की भविष्यात आपलीही एखादी नाट्य संस्था असेल आणि आपली स्वतःची नाटकाची बस असेल. २०१५ साली जेंव्हा ‘भरत जाधव एंटरटेनमेंट कंपनी’ ची पहिली बस घेतली तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद आई बाबांना झाला. आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर खरं हास्य आणि समाधान आलं यातंच सगळं मिळवलं मी..! या कला क्षेत्राने मला अशा अगणित सुखी क्षणांची भेट दिलीये. #कृतज्ञता #सुखीमाणसाचासदरा

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on

पुढे त्यांनी, ‘ऑल द बेस्ट’ माझं पहिलं व्यावसायिक नाटक. तेंव्हा मला १०० रूपये नाईट मिळायची. त्यावेळी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की भविष्यात आपलीही एखादी नाट्य संस्था असेल आणि आपली स्वतःची नाटकाची बस असेल. २०१५ साली जेंव्हा ‘भरत जाधव एंटरटेनमेंट कंपनी’ ची पहिली बस घेतली तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद आई बाबांना झाला. आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर खरं हास्य आणि समाधान आलं यातंच सगळं मिळवलं मी..! या कला क्षेत्राने मला अशा अगणित सुखी क्षणांची भेट दिलीये.’

सध्या भरत जाधव यांची ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका २५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने भरत आणि केदार ही जोडगोळी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 11:39 am

Web Title: bharat jadhav shares happy moments in his life avb 95
Next Stories
1 Birthday special: म्हणून पहिल्याच चित्रपटाने १०० कोटी कमावूनही असिन आहे बॉलिवूडपासून दूर
2 ‘कुछ कुछ होता है’मधील क्यूट सरदार परजान दस्तूर लवकरच अडकणार लग्न बंधनात
3 ४८ व्या वर्षी मंदिरा बेदी झाली एका मुलीची ‘माय’
Just Now!
X