News Flash

“ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आहे”, भरत जाधवचं चाहत्यांना आवाहन

भरत जाधवची पोस्ट सोशल मीडियावर झाली व्हायरल..

(Photo credit : Bharat jahav instagram)

देशात सध्या करोनाची दुसरी लाट आलेली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. तर, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. सरकारकडून करोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती, कडक निर्बंध, लॉकडाउनसह वैद्यकीय यंत्रणा अधिक गतीमान व बळकट करण्याचे काम सुरू आहे. एवढंच नाही तर कलाकारल देखील त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून घरीच राहण्याचे सल्ले देत आहेत. दरम्यान, अभिनेता भरत जाधवने देखील त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे संदेश दिला आहे.

भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत भरतने हात जोडल्याचे दिसत आहे. तर भरतने गुलाबी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत भरतने करोना संबंधीत एक महत्त्वाचा संदेश त्याच्या चाहत्यांना दिला आहे. “स्मारकं वर्षभरापासून बंद आहेत.. पण रुग्णालये २४ तास सुरू आहेत.. निदान या पुढे तरी काळाची गरज ओळखता आली पाहिजे. आयुष्याशी झुंजणा-या प्रत्येकासाठी प्रार्थना करा. त्या सगळ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, तिथले शिपाई, बाकी मेडिकल स्टाफ यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आहे,” असे कॅप्शन त्याने दिले आहे.

करोनाच्या वाढत्या संक्रमणात प्रत्येक व्यक्तीने त्याचा एकतरी जवळचा व्यक्ती हा गमावला आहे. त्यात आता आपण स्वत:ची नीट काळजी घेतली पाहिजे. करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ३० एप्रिल पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 7:08 pm

Web Title: bharat jadhav talked about corona and requested his fans dcp 98
Next Stories
1 ‘मी तुमच्या विरोधात केस करेन’, हॉट फोटो पाहून म्हणणाऱ्याला हिना खानचे भन्नाट उत्तर
2 ‘टॉकीज मनोरंजन लीग’मध्ये येत्या रविवारी अ‍ॅक्शनचा धमाका
3 Video: सध्याचा ओटीटीचा कारभार! प्रसाद ओक आणि अक्षय बर्दापूरकर पाहा काय म्हणतायत
Just Now!
X