मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. एक नवी कोरी मालिका घेऊन केदार शिंदे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे नाव ‘सुखी माणसाचा सदरा’ असे असून या मालिकेत अभिनेता भरत जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे भरत जाधवला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
भरत जाधवने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने पोस्टमध्ये, ‘बऱ्याच दिवसांनी तुम्हाला सांगावं.. तुमच्या समोर सादर करावं.. आणि तुम्ही आवर्जून पहावं असं काहीतरी करायला मिळतंय.. एक नवा विषय.. एक ताजी मालिका.. लवकरच घेऊन येतोय.. तुमचा आशीर्वाद पाठीशी असेलच याची खात्री आहे!!!’ असे म्हटले आहे.
‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका कलर्स मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत भरत जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण भरतसोबत इतर कोणते कलाकार दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 1, 2020 12:26 pm