25 February 2021

News Flash

तोंडात वांगं लटकवून भारतीची लाइव्ह कॉमेंट्री: व्हिडिओ झाला व्हायरल

हा गंमतीशीर व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच...

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन भारती सिंह सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या विनोदी व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी भारती चक्क दातांमध्ये घातलेल्या अनोख्या दागिन्यांमुळे चर्चेत आहे. हा दागिना पाहून तुम्हालाही आपले हसू रोखता येणार नाही.

भारतीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिीओमध्ये ती दातांसाठी तयार केलेला अनोखा दागिना दाखवत आहे. २०१२मध्ये तिने हा दागिना परिधान केला होता. तेव्हापासून आजपर्यंत तिने याला उतरवलेले नाही. खरं तर हा दागिना म्हणजे एक वांग आहे. या वांग्यामुळे भारतीचे सौंदर्य आणखी खुलून दिसते असं नेटकरी म्हणत आहेत. भारतीचा हा विनोदी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

२००८ साली ‘द ग्रेड इंडियन कॉमेडी शो’ या स्पर्धेतून भारतीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’ यांसारख्या अनेक स्टँडअप कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय ती ‘एफ. आय. आर.’, ‘बिग बॉस’, ‘अदालत’, ‘खिलाडी 786’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही झळकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 2:37 pm

Web Title: bharti singh funny video viral mppg 94
Next Stories
1 नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना’
2 खोल समुद्रात पोहतानाचा कतरिनाचा व्हिडीओ व्हायरल
3 “सोनू सूद लोकांना घरी पोहोचवतोय मग आपण कुठे कमी पडतोय?”; जितेंद्र जोशीला पडला प्रश्न
Just Now!
X