News Flash

झोका घेताना तोल गेला अन्…; भारती सिंहचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कॉमेडी क्वीन भारती सिंह ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती कायमच तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करत असते. सध्या भारतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

भारतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती फार्महाउसवर सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तसेच तेथे असलेल्या झोपाळ्यावर भारती झोका घेत होती. हा झोका एका झाडाला टांगलेला दिसत आहे. भारतीला एक महिला झोका देताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा : ‘अब तो आदत सी हो गयी है ऐसे जीने की’, आयपीएल स्थगित केल्याने मीम्सचा पाऊस

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

दरम्यान भारतीचा तोल गेला आणि झोक्यावरुन ती खाली पडली आहे. खाली पडल्यानंतर भारतीला स्वत:ला हसू अनावर झाले आहे. झोक्यावरुन खाली पडल्यामुळे भारतीला कोणतीही दुखापत झालेली नाही. भारतीचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

सध्या भारती पती हर्षसोबत ‘डान्स दीवाने’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या मंचावरून प्रेक्षकांचे कायम मनोरंजन करणाऱ्या भारतीला नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये मात्र रडू कोसळले होते. एका स्पर्धकाच्या डान्स परफॉर्मन्सनंतर तिच्या भावनांचा बांध फुटला. डान्स सादर करणाऱ्या तरुणींने त्यांच्या डान्समधून एका सत्य घटनेवर आधारित नृत्य सादर केलं. एका महिलेने करोनामुळे आपल्या १४ दिवसाच्या बाळाला गमावल्याचं डान्समध्ये दाखवण्यात आले होते. हा परफॉर्मन्स पाहून शोमधील सर्वच यावेळी भावूक झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 7:04 pm

Web Title: bharti singh funny video viral on social media avb 95
Next Stories
1 निक्की तांबोळीनंतर पिया वाजपेयीच्या भावाचे करोनामुळे निधन
2 जून महिन्यात प्रदर्शित होणार ‘द फॅमिली मॅन २’?
3 आता हिंदीमध्ये सुद्धा येणार ‘दृश्यम २’ चा रीमेक, पुन्हा झळकणार अजय-तब्बूची जोडी
Just Now!
X