09 August 2020

News Flash

भारतीने व्हिडीओ शेअर करत उडवली टिक-टिकटॉकर्स खिल्ली?

हा व्हिडीओ पाहून तुम्हाली हसू येईल.

सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच कलाकार आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत तसेच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे दिसत आहे. सध्या कॉमेडीयन भारती सिंहचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या टिक-टॉक आणि यूट्यूूब या वादावर असल्याचे म्हटले जात आहे. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.

नुकताच भारतीचा पती हर्षने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक टिक-टॉक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भारती सीरियस मोडमध्ये गाणे बोलताना दिसत आहे. दरम्यान हर्ष तेथे येतो आणि सीरियस मोडला फनी मोडमध्ये बदलून टाकतो. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Haarsh Limbachiyaa (@haarshlimbachiyaa30) on

व्हिडीओमध्ये भारतीने स्वत:ला टिकटॉकर्स असा टॅग दिला आहे आणि हर्षला यूट्यूबर्स असा टॅग दिला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर असणाऱ्या टिक-टॉक आणि यूट्यूवर सुरु असलेल्या वादावर आधारित असून भारतीने टिकटॉकर्सची खिल्ली उडवली असल्याचे म्हटले जाते.

भारती आणि हर्षने ‘खतरों के खिलाडी पर्व ९’मध्ये सहभाग घेतला होता. दोघांच्या जोडीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. तसेच भारती आणि बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे संवाद विशेष चर्चेत होते. आता हर्षने ‘खतरों के खिलाडी पर्व १०’मध्ये पुन्हा पाहुणा स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 10:00 pm

Web Title: bharti singh harsh limbachiya funny tik tok video viral avb 95
Next Stories
1 झी युवावर मनोरंजनाची मेजवानी!
2 तुझ्या बायकोचा धर्म कोणता? अभिनेत्याने दिले भन्नाट उत्तर, होतेय प्रशंसा
3 अभिनेत्रीला क्वारंटाइन केंद्रातच वाटतेय करोनाची भीती, केला व्हिडीओ शेअर
Just Now!
X