21 April 2019

News Flash

भाऊ कदमने साफसफाई कर्मचाऱ्यांना मदत करत साजरी केली दिवाळी

मुंबईतल्या वांद्रे इथल्या निवासी वसाहतीत स्वच्छता मोहीम राबवत भाऊ कदमने पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मदत केली.

भाऊ कदम

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आपापल्या परीने प्रत्येकजण हा सण खास पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच अभिनेता भाऊ कदमने मात्र सामाजिक कार्य करत अनोखी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या वांद्रे इथल्या निवासी वसाहतीत स्वच्छता मोहीम राबवत भाऊ कदमने पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मदत केली.

यावेळी भाऊसोबत त्याच्या आगामी ‘नशिबवान’ या चित्रपटाची टीमसुद्धा होती. मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कचरा वेचण्यासाठी मदत करत भाऊने चाहत्यांना महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. दिवाळीच्या निमित्ताने ठिकठिकाणी फटाके फोडले जातात आणि या फटाक्यांमुळे होणाऱ्या कचऱ्याकडे आणि प्रदूषणाकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र हाच कचरा साफ करत स्वच्छतेचा संदेश भाऊने चाहत्यांना दिला आहे.

 

bhau kadam

वाचा : आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मोडले हे सहा बॉक्स ऑफीस रेकॉर्ड

लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि अमोल वसंत गोळे दिग्दर्शित नशिबवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात भाऊ कदम मुख्य भूमिकेत आहे. त्यासोबतच मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

First Published on November 9, 2018 7:03 pm

Web Title: bhau kadam celebrated diwali in a unique way by helping cleaning workers