मराठीत अनेक विनोदवीर आहेत. मात्र या सर्वांमध्ये प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतो तो म्हणजे अभिनेता भालचंद्र अर्थात भाऊ कदम. भाऊने आपल्या धमाल विनोदबुद्धी व अचूक टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. खऱ्या आयुष्यात तो मात्र अत्यंत साधा भोळा आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या भाऊने आपल्या स्वभावातील साधेपणा कधीच सोडला नाही. भाऊ कदमचा आज ५०वा वाढदिवस. भाऊ कदमच्या वाढदिवसानिमित्त त्याचं बालपण जिथे गेलं, त्या जागेचा फोटो पाहुयात.

‘माझे बालपण’ असं कॅप्शन देत भाऊने हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. या फोटोची जागा मुंबईतीली बीपीटी क्वॉटर्सची आहे. एका कोकणी कुटुंबात जन्मलेल्या भाऊचे वडील बीपीटीत नोकरी करत होते. तर आई गृहिणी होत्या. बालपणापासूनच त्यांना त्यांच्या घरातले सर्व भाऊ म्हणून हाक मारतात. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

Photos: ‘शेवंता’च्या नव्या लूकवर नेटकरी फिदा

वडिलांच्या अकाली निधनानंतर घराची सर्व जबाबदारी भाऊवर पडली. तेव्हा बीपीटीमधील घरसुद्धा सोडावे लागले. वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. उदनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीला कारकुनाचेही काम केले होते. भाऊला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कठोर मेहनतीमुळे त्यांना हे यश गवसलं आहे.