News Flash

‘या’ ठिकाणी गेलं भाऊ कदमचं बालपण; मुंबईतील ही जागा ओळखलीत का?

'माझे बालपण' असे कॅप्शन देत भाऊने पोस्ट केला फोटो

मराठीत अनेक विनोदवीर आहेत. मात्र या सर्वांमध्ये प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतो तो म्हणजे अभिनेता भालचंद्र अर्थात भाऊ कदम. भाऊने आपल्या धमाल विनोदबुद्धी व अचूक टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. खऱ्या आयुष्यात तो मात्र अत्यंत साधा भोळा आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या भाऊने आपल्या स्वभावातील साधेपणा कधीच सोडला नाही. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. जिथे त्याचं बालपण गेलं, त्या जागेचा फोटो भाऊने पोस्ट केला आहे.

‘माझे बालपण’ असं कॅप्शन दिलेल्या या फोटोची जागा मुंबईतीली बीपीटी क्वॉटर्सची आहे. एका कोकणी कुटुंबात जन्मलेल्या भाऊचे वडील बीपीटीत नोकरी करत होते. तर आई गृहिणी होत्या. बालपणापासूनच त्यांना त्यांच्या घरातले सर्व भाऊ म्हणून हाक मारतात. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

वडिलांच्या अकाली निधनानंतर घराची सर्व जबाबदारी भाऊवर पडली. तेव्हा बीपीटीमधील घरसुद्धा सोडावे लागले. वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. उदनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीला कारकुनाचेही काम केले होते. भाऊला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कठोर मेहनतीमुळे त्यांना हे यश गवसलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 12:50 pm

Web Title: bhau kadam childhood place photo shared by him ssv 92
Next Stories
1 Video: अक्षयचा ‘बाला चॅलेंज’ स्वीकारला अमृताच्या घरातील चिमुकल्याने
2 Photo : बोल्ड अंदाजात सोनमने शेअर केले फोटो
3 अल्बम लॉन्च झाला, पण रानू मंडल सध्या करतात काय?
Just Now!
X