विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेला भाऊ कदम लवकरच हंगामा प्लेच्या आगामी मराठी ओरिजिनल सीरिजमध्ये झळकणार आहे. श्री कामदेव प्रसन्न असं या सीरिजचं नाव आहे. यामध्ये त्याच्यासोबत प्रसिद्ध विनोदवीर सागर करंडे, अभिनेत्री भाग्यश्री मोटे, आशा शेला आणि विनय येडेकर यांच्याही भूमिका आहेत.

‘या नव्या वेब सीरिजसाठी मी शूटिंग सुरू केले आहे. यामध्ये मी आयुष्यातील काही मजेशीर प्रसंगांमध्ये सागरला मदत करताना दिसेन. यातील माझी व्यक्तिरेखा शब्दश: या पृथ्वीवरील नाही. खरे तर माझी व्यक्तिरेखा हाच त्याच्या आयुष्यातील गोंधळाचे कारण आहे. हंगामा प्लेसोबत एका डिजीटल मालिकेत काम करायला मिळत आहे याचा मला आनंद आहे. डिजीटल माध्यमाने रोचक कथा सांगण्याची संधी दिली आहे आणि कलावंतांना यामुळे कोणत्याही अडसराशिवाय काम करण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे,’ असं भाऊ कदम म्हणाला.

amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”

सागर कारंडे त्याच्या भूमिकेविषयी म्हणाला, ‘मी यात एका लाजाळू आणि अंतर्मुख माणसाची भूमिका करत आहे. या माणसाच्या आयुष्यात काही अनोख्या परिस्थिती येतात आणि त्या त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. त्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्याला भाऊ कदमच्या व्यक्तिरेखेने दिलेली मदत स्वीकारावीच लागते आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात आणखी गोंधळ होतो. त्यातून काही विनोदी क्षण निर्माण होतात. मला आणि अन्य सर्व कलाकारांना आमच्या अनोख्या अवतारांमध्ये या मालिकेत पाहणे प्रेक्षकांसाठी खूप मजेशीर असेल अशी मला खात्री आहे.’

हंगामा डिजीटल मीडिया आणि कॅफे मराठी यांची निर्मिती असलेली ‘श्री कामदेव प्रसन्न’ ही मालिका हंगामा प्लेवर लवकरच सादर केली जाईल.