News Flash

VIDEO : भाऊ कदम झाला ‘सिम्बा’, ‘मल्हारी’ गाण्यावर धरला ठेका

‘सिम्बा’ हा सिनेमा २८ डिसेंबर रोजी २०१८ प्रदर्शित होत आहे.

‘सिम्बा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग लवकरच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मालिकेमध्ये येणार आहे. सोमवारी आणि रविवार या भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. भाऊ कदमने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सिम्बा साकारला आहे. भाऊ कदमने प्रेक्षकांना हासवण्यासाठी रवणीरच्या चित्रपटातील काही संवादला आपला टच दिला आहे.

रणवीर सिंह आपल्या प्रत्येक सिनेमा आणि हटके डान्समुळे कायमच चर्चेत राहिला आहे. रणवीर सिंहच्या ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील ‘मल्हारी’ हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे.  चला हवा येऊ द्या मध्ये भाऊ कदमने चक्क ‘मल्हारी’ या गाण्यावर डान्स केला. या गाण्यावरचा भाऊचा डान्स बघून रणवीर सिंह, रोहित शेट्टी आणि सिम्बाची संपूर्ण टीम आश्चर्यचकित झाली. आणि हास्याचा एकच कल्लोळ फुटला. सोमवारी भाऊ कदम सिम्बा होऊन तुम्हाला हसवण्यासाठी येत आहे. ‘सिम्बा’ हा सिनेमा २८ डिसेंबर रोजी २०१८ प्रदर्शित होत असल्याने या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यात चला हवा येऊ द्यामध्ये रणवीर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रणवीर सिंग अतिउत्साह, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणं, खोडकर स्वभाव अनेकांना भावतो. रणवीरचा बिधास्तपणा त्याला नेहमीच इतरांपेक्षा वेगळं ठरवतो.

एखादी गोष्ट मनात आली की लोक काय म्हणतील याचा विचार करण्याऱ्यांपैकी रणवीर नाही. त्यामुळेच आता तो चला हवा येऊ द्याच्या मंचावर काय काय धम्माल करतो याकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

‘सिम्बा’ सिनेमामध्ये मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचीही महत्वाची भूमिका असल्याने या कार्यक्रमामध्ये तोही सहभागी आहे.

या आधी आलेले बडे स्टार्स

चला हवा येऊ द्या मध्ये बॉलिवूडमधील मोठे कलाकार येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही थुकरटवाडीमध्ये शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम, अक्षय कुमार, इरफान खान, अजय देवगण, रितेश देशमुख यासारख्या मंडळींने हजेरी लावली आहे. या यादीमध्ये आता रणवीरचाही समावेश होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 8:18 pm

Web Title: bhau kadam simbha chala hawa yeu dya
Next Stories
1 तैमूरने आधी शिक्षण पूर्ण करावं मग करीअर निवडावं-करीना
2 Zero box office collection : किंग खानची जादू ओसरली? पहिल्या दिवशी कमाई जेमतेम
3 अर्जुन रामपाल अडचणीत, कंपनीने केली फसवणूकीची तक्रार
Just Now!
X