20 October 2020

News Flash

‘जगावेगळी अंतयात्रा’ या चित्रपटात भाऊ कदमची मुख्य भूमिका

या चित्रपटात गंभीर विषयाला विनोदी अंगाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे

'जगावेगळी अंतयात्रा' हा चित्रपट येत्या २३ मार्चला प्रदर्शित होणार

सध्या मराठी चित्रपटातून सातत्याने नवनवीन प्रयोग होताना दिसताहेत, त्यातच एका नाविन्यपूर्ण विषयाला हात घालणारा चित्रपट म्हणजे ‘जगावेगळी अंतयात्रा’. ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजेच भाऊ कदम या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. नोकरी हा आजच्या तरुण पिढीसमोर भेडसावणारा गंभीर प्रश्न, त्यात उच्चशिक्षित तरुणांपुढे जर ही समस्या आली तर ते कशापद्धतीने सामोरे जातात आणि त्यांच्या कर्तुत्वाने ते इतरांपुढे काय आदर्श घालून ठेवतात ही गंमत या चित्रपटात विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे.

अल्टीमेट फिल्म मेकर्स बॅनरखाली डॉ .नितीन श्याम तोष्णीवाल निर्मित आणि अमोल लहांडे दिग्दर्शित या चित्रपटात भाऊ कदम, माधव अभ्यंकर ,राजन भिसे ,सुहास परांजपे या दिग्गज कलावंताबरोबरच सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित , विनम्र भाबल, डॉ.विशाल गोरे आणि शिवानी भोसले या नवोदित कलावंतांचाही समावेश आहे. या चित्रपटात गंभीर विषयाला विनोदी अंगाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, हसता हसता एका महत्वाच्या समस्येबाबतही हा चित्रपट विचार करायला प्रवृत्त करणारा असल्याचे दिग्दर्शक अमोल लहांडे यांनी सांगितले.

Baaghi 2 trailer: दिशासाठी टायगरचा ‘वन मॅन आर्मी’ शो

या चित्रपटातील गाण्यांना संगीतकार रोहन-रोहन या जोडगोळीने मनाला भुरळ घालणारे संगीत दिले असून सिध्दार्थ महादेवन ,महालक्ष्मी अय्यर ,वैशाली सामंत, सुरेश वाडकर यांसारख्या दिग्गज गायकांचा सुमधूर स्वरसाज लाभला आहे. एक नवीन विषय, त्याला साजेशे कलावंत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. येत्या २३ मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 7:27 pm

Web Title: bhau kadam starrer marathi movie jagavegli antayatra
Next Stories
1 मी एकमेव अयशस्वी ‘बँकचोर’, रितेशचा जबरदस्त टोला
2 Baaghi 2 trailer: दिशासाठी टायगरचा ‘वन मॅन आर्मी’ शो
3 कंगना रणौत आणि बिपाशा बासूचा गितांजलीवर करारभंगाचा आरोप
Just Now!
X