25 February 2021

News Flash

Bhavesh Joshi Superhero trailer: सुपरपॉवर नसलेला सुपरहिरो भावेश जोशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

'अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर' या सुपरहिरोपटाची जोरदार चर्चा सुरू असतानाच बॉलिवूडचा एक सुपरहिरो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'भावेश जोशी सुपरहिरो'

सध्या बॉक्स ऑफीसवर ‘अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ या सुपरहिरोपटाची जोरदार चर्चा सुरू असतानाच बॉलिवूडचा एक सुपरहिरो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र इतर सुपरहिरोंसारखे त्याच्याकडे सुपरपॉवर्स नाहीत. तो एक सामान्य व्यक्तीच आहे, पण त्याचं कर्तृत्व असामान्य आहे. बॉलिवूडचा हा नवा सुपरहिरो आहे भावेश जोशी. अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात हर्षवर्धन एका सुपरहिरोची भूमिका साकारत असून कागदाचा मुखवटा लावून तो अनोळखी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. लोकांना मदत करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. मात्र, काही राजकारण्यांकडून भावेशच्या कामात अडथळे निर्माण केले जातात. तेव्हा मुखवट्याचा त्याग करून हा सुपरहिरो या अडथळ्यांना कसा सामोरं जातो, लोकांची कशाप्रकारे मदत करतो हे सर्व चित्रपटात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात रंगणार चोर- पोलीसचा खेळ

इरॉस इंटरनॅशनल, रिलायंस एंटरटेन्मेंट, विकास बहल, मधू मंटेना आणि अनुराग कश्यप या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट हर्षवर्धन आणि विक्रमादित्य या दोघांच्याही दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. विक्रमादित्यने यापूर्वी ‘लुटेरा’, ‘उडान’, ‘ट्रॅप्ड’ हे चित्रपट साकारले होते. पण, ‘भावेश जोशी…’च्या निमित्ताने त्याने एका वेगळ्या धाटणीच्या कथानकावर काम करण्याचं धाडस दाखवलं आहे. हर्षवर्धननेही या चित्रपटातील भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता या दोघांच्या आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांना यश मिळणार का, हे जाणून घेण्यासाठी २५ मे चीच वाट पाहावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 4:52 pm

Web Title: bhavesh joshi superhero trailer where he plays a superhero minus any superpowers
Next Stories
1 यावेळीही बिग बींच्या शुभेच्छा बर्थ डे गर्ल अनुष्कापर्यंत पोहोचल्याच नाही!
2 राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘रेडू’चा धडाका
3 श्रीदेवी यांचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी बोनी कपूर दिल्लीत दाखल
Just Now!
X