News Flash

‘भय’ इथले संपत नाही

माणसाचे मन ही मोठी अजब गोष्ट आहे. मनाचे भाव, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचाविज्ञानाला उलगडा झाला आहे.

| June 6, 2015 11:45 am

माणसाचे मन ही मोठी अजब गोष्ट आहे. मनाचे भाव, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचाविज्ञानाला उलगडा झाला आहे. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते.ही भीती कशाचीही असू शकते.उंचीची, गर्दीची, एकटेपणाचीअगदी कशाचीही भीती एखाद्याला सतावत असते. ह्या भीतीवर मात न करता येणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था होत असेल? भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना काय अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंगवून टाकणारा प्रवासम्हणजे…‘भय’हा चित्रपट.
एखाद्या गोष्टीचा फोबिया असणं ही पॅरानॉईड स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. या आजाराने ग्रस्त व्यक्तींना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर ते कशाप्रकारे मात करू शकतात या विषयावर भाष्य करणारा ‘भय’ चित्रपट लवकरच येत आहे.सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत चालू असून चित्रपटातील मागणीनुसार एक गाणं लवकरच दुबईत चित्रित करण्यात येणार आहे.
‘भय’ या वेगळ्या धाटणीच्या सिनेमाच्यादिग्दर्शनाची आणि संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.कथा,पटकथा,संवाद नितीन सुपेकर यांचे असून अभिषेक प्रताप खणकर यांनी गीते लिहिली आहेत.या गीतांनाअजित समीर यांचा संगीत साज आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे याचं आहे.
निर्माते सचिन कटारनवरे व सहनिर्माते अजय जोशी, अनिल साबळे यांनी नाविन्यपूर्ण आशयाच्या ‘भय’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत या चित्रपटातअभिजीत खांडकेकर,उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर,विनीत शर्मा, संस्कृती बालगुडे, सिद्धार्थ बोडके यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2015 11:45 am

Web Title: bhay marathi movie
टॅग : Marathi Movie
Next Stories
1 पंचवीस वर्षांंनंतर सुमीत पुन्हा हीरो
2 ‘काहीही हं श्री’चा ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर धुमाकूळ!
3 ‘शॉर्टकट’ दिसतो पण नसतो
Just Now!
X