17 January 2019

News Flash

VIDEO : उमेश-तेजश्रीची केमिस्ट्री दाखवणारे व्हॅलेंटाइन डे विशेष गाणे

प्रेमवीरांसाठी खास व्हॅलेंटाइन डे निमित्ताने 'भेटते ती अशी' हे रोमॅण्टिक गाणे प्रदर्शित करण्यात आले.

उमेश कामत

‘प्रेम’ ही कधीच न बदलणारी संकल्पना असून, ती नेहमीच एका नव्या रुपात आपल्यासमोर येत असते. प्रेमाच्या बेधुंद लहरीत रंगणा-या प्रेमीयुगुलांसाठी तर प्रेमाचा प्रत्येक दिवस नव्याने प्रेमात पाडणारा असतो. अश्या या प्रेमवीरांसाठी खास व्हॅलेंटाइन डे निमित्ताने ‘भेटते ती अशी’ हे रोमॅण्टिक गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

Sui Dhaaga first look वाचा : सर्वसामान्य जोडप्याच्या रुपात वरुण-अनुष्का

झेलू एंटरटेन्मेन्टस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘असेही एकदा व्हावे’ या आगामी सिनेमातील हे गाणे असून, सिटीलाईट येथे खास गुलाबी वातावरणात या गाण्याचे दिमाखदार लाँचिंग करण्यात आले. लाल रंगाची फुले, केक आणि फुगे अश्या रोमॅण्टिक अंदाजात पार पडलेल्या या कार्यक्रमाचा उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला.

वाचा : त्या गोष्टीचा अजूनही पश्चात्ताप होतो- दीपिका पदुकोण

येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील ‘भेटते ती अशी’ हे गाणे अभिनेता उमेश कामतवर चित्रित करण्यात आले आहे. उमेश – तेजश्रीची केमिस्ट्री मांडणारे हे गाणे, वैभव जोशीने शब्दबद्ध केले आहे. तसेच सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते याने स्वतः हे गीत गायले असून, याचे संगीत दिग्दर्शनदेखील केले आहे. तसेच दिपाली विचारे हिने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या भेटीची आठवण सांगणारे हे गाणे, प्रेमीयुगुलांसाठी पर्वणी ठरत आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडणा-या या सिनेमाचे मधुकर रहाणे निर्माते आहेत.

First Published on February 13, 2018 2:30 pm

Web Title: bhetate ti ashi movies asehi ekada vhave song featuring umesh kamat tejashree pradhan