16 January 2018

News Flash

‘या’ अभिनेत्रीची मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या

बनावट किल्ल्यांच्या सहाय्याने तिच्या घराचं दार उघडण्यात आलं.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 5:33 PM

अंजली श्रीवास्तव

भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तवने तिच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. डी. एन. नगर पोलीस स्थानकाच्या माहितीनुसार जुहू येथील राहत्या घरी तिचा मृतदेह सापडला आहे. अंजलीसोबत कोणताही संपर्क होत नसल्याचं लक्षात येताच तिच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस तपासादरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आला.

अंजली जुहू येथील परिमल सोसायटीमध्ये राहात होती. पोलिसांना अंजलीबाबत कळताच त्यांनी तिचं घर गाठलं. घरमालकाकडे असलेल्या बनावट किल्ल्यांच्या सहाय्याने तिच्या घराचं दार उघडण्यात आलं. बनावट किल्ल्यांनी घराचं दार खोलताच अंजलीचा मृतदेह घराच्या सिलिंगला लटकल्याचं पाहायला मिळालं. पंख्याला साडी बांधून तिने गळफास घेतल्याचं म्हटलं जात असून, कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचंही स्पष्ट होत आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अंजलीचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवल्याचं वृत्त हाती आलं आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनेही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही अंजलीच्या आत्महत्येसंदर्भात एक ट्विट करण्यात आलं होतं. ‘२९ वर्षीय अंजली श्रीवास्त हीने तिच्या अंधेरीतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे’, असं त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. भोजपूरी चित्रपटांमध्ये अंजली चांगलीच नावाजली गोली होती. काही दिवसांपूर्वीच अंजलीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन तिच्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये तिने एक व्हिडिओ शेअर केला होता.

पाहा : शबिना सलमानला आपल्या तालावर नाचवते तेव्हा…

First Published on June 19, 2017 5:33 pm

Web Title: bhojpuri actress anjali srivastava allegedly commits suicide at her mumbai home
  1. No Comments.